Top 50 News | 12 PM | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | Superfast News | 16 May 2025 | ABP Majha
गोध्राकांडात मोदींना अटक करु नये यासाठी शरद पवारांनी भूमिका घेतली, कॅबीनेट बैठकीत पवारांनी मांडलेल्या प्रस्तावाला मूकसंमती मिळाली आणि मोदींची अटक टळली, राऊतांचा पुस्तकातून खळबळजनक दावा.
बाळासाहेबांनी अमित शाहांवर उपकार केले, नर्कातला स्वर्ग पुस्कातून खासदार संजय राऊतांचे खळबळजनक दावे, गुजरात दंगल प्रकरणी शाह संकटात असताना बाळासाहेबांनी त्यांना वाचवल्याचा पुस्तकातून दावा.
गुजरात दंगल प्रकरणी बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शाहांच्या जीवनातल्या, राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या, संजय राऊतांच्या नर्कातल्या स्वर्ग पुस्तकातून दावा.
बाळासाहेबांनी ज्यांना मदत केली ते अमित शाह शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी निर्घृणपणे वागले, राऊतांचा हल्लाबोल, पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवलं हे सगळ्या जगानेच पाहिल्याचाही हल्लाबोल.
आम्ही आजही खऱ्या शिवसेने सोबत, काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या सेने सोबत नाही, संजय राऊतांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देतांना गिरीश महाजनांची टीका.
अजून खुप काही लिहिता आलं असतं, मात्र आपण मर्यादा पाळल्या, संजय राऊतांची पुस्कातील लिखाणावर प्रतिक्रिया, आणखी लिहिलं असतं तर हाहाकार माजला असता असंही वक्तव्य.
बाळासाहेब आणि शिवसेनेने केलेल्या मदतीची शाहांनी पक्ष फोडून परतफेड केली, संजय राऊतांचा हल्लाबोल,
संजय राऊतांच्या पुस्तकाची स्क्रिप्ट ही मनाने लिहिलेली सिनेमाची स्क्रिप्ट वाटते, संजय शिरसाट यांचं टीकास्त्र, राऊतांचं लिखाण हास्यास्पद असल्याचाही केली टीका.
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
