एक्स्प्लोर

माहेरी आलेल्या लेकीवर काळाचा घाला, स्लॅब कोसळून दोन वर्षांची चिमुकली ठार; आईने फोडला हंबरडा

सप्तशृंगी इमारतीच्या तळमजल्यावर जयश्री गुजर घरात किचनमध्ये काम करत होत्या. याच दरम्यान दुपारच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला.

ठाणे : कल्याणच्या चिकणीपाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीच्या दुर्घटनेनं अनेक कुटुबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून दोन वर्षांच्या चिमुकलीनेही आपला जीव गमावला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एक दिवस अगोदरच ती चिमुकली तिच्या आईसह मामाच्या गावी आली होती. मात्र, तोच एक दिवस काळ बनून जीवावर उठला. नमस्वी शेलार असे या मृत मुलीचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या (Fire birgade) जवानांनी इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर येथील उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तर, आपल्या चिमुकलीचा मृतदेह हाती घेऊन आईने हंबरडा फोडला, हे काळीज पिळवटून टाकणारे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. 

सप्तशृंगी इमारतीच्या तळमजल्यावर जयश्री गुजर घरात किचनमध्ये काम करत होत्या. याच दरम्यान दुपारच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. मोठ्ठा आवाज झाल्याने जयश्री बाहेर आल्या तर भला मोठा स्लॅब कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, काही क्षणातच सगळीकडे मोठी धूळ पसरली. या धक्क्यातून सावरतेच तोच आपली आजी,आत्या, 4 वर्षांचा भाचा, दोन वर्षांची भाची ढीगाऱ्याखाली असल्याचे जयश्रीच्या लक्षात आले. आजूबाजूच्या नागरिकांनी लगेचच धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केलं. याच दरम्यान अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत जयश्री बचावली तरी तिची आजी सुशीला शेलार, दीड वर्षाची भाची नमस्वी शेलार यांचा मृत्यू झाला. तर, तिची आत्या अरुणा विरणारायन आणि भाचा श्रविल शेलार जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आईच्या भेटीसाठी आली होती लेक

लेक आईला भेटण्यासाठी नाशिकच्या सिन्नरवरून कल्याणला घटनेच्या एक दिवस अगोदर आली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाची तयारी सुरू होती, नात जयश्री किचनमध्ये जेवणाचे नियोजन करत होती, तर हॉलमध्ये माय-लेकीच्या गप्पा मारत होत्या. चिमुकलं लहान मुलं दुपारच्या झोपेत होतं, त्यातच अचानक मोठा आवाज झाला आणि डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झालं. या दुर्घटनेत झोपेत असलेली लहान मुलगी ढिगाऱ्यात अडकून पडली, बचाव कार्यादरम्यान दोघांना वाचवण्यात यश आले पण दोन वर्षांच्या चिमुकलीचे झोपेत असतानाच तिचे निधन झाले. 

Building Collapse: कल्याण इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे

प्रमिला साहू (वय 58)
नामस्वी शेलार (वय दीड वर्षे)
सुनीता साहू (वय 37) 
सुजाता पाडी (वय 32)
सुशीला गुजर (वय 78)
व्यंकट चव्हाण (वय 42) 

जखमींची नावे

अरुणा रोहिदास गिरणारायन (वय 48)
शरवील श्रीकांत शेलार (वय 4)
विनायक मनोज पाधी (वय साडेचार वर्षे)

हेही वाचा

केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune NDA Passing Out Parade 2025 : रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
Dharashiv News: धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
Crime News : मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
India Vs Pakistan: पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anil Kaspate Special Report : आधी वैष्णवीचा छळ, चारित्र्यावर शिंतोडे, मनावर ओरखडे Vaishnavi HagawaneZero Hour Full : वैष्णवीला 'थप्पड' मारली...बस इतनी सी बात? हगवणेंच्या वकीलांचा युक्तीवाद...आणि वाद!Ladki Bahin Yojana Special Report :'लाडकी'चा निधी जोरात वादावादी;तिजोरीवर भार ,लाडकीसाठी निधी पळवला?Beed Mango Farmer : पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त, शेतकरी महिलेचा अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune NDA Passing Out Parade 2025 : रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
Dharashiv News: धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
Crime News : मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
India Vs Pakistan: पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
Gokul Chairman : शशिकांत पाटील की नाविद मुश्रीफ? 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला; आज दुपारी लखोटाबंद नाव समोर येणार!
शशिकांत पाटील की नाविद मुश्रीफ? 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला; आज दुपारी लखोटाबंद नाव समोर येणार!
Anushka Sharma : आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
Gokul : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव, कमालीची गुप्तता, संचालकांना लिफाफ्यातून नाव कळवणार
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव, अध्यक्षपदी कुणाची वर्णी?
Shehbaz Sharif : भरताविरोधात काही करण्यापूर्वीच ब्रह्मोसचा कहर, शाहबाज शरीफ यांची कबूली; वर्मावर घाव घालत भारताचं प्रत्युत्तर
भरताविरोधात काही करण्यापूर्वीच ब्रह्मोसचा कहर, शाहबाज शरीफ यांची कबूली; वर्मावर घाव घालत भारताचं प्रत्युत्तर
Embed widget
OSZAR »