ABP Majha Headlines : 7 AM : 22 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 22 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण...मारेकरी अजूनही मोकाट, एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज
गद्दार हेर ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार, हरियाणाच्या हिस्सार कोर्टात हजर करणार, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ज्योतीवर आरोप
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरुच... कनिमोळींच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार... संजय झा आणि श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळं कालच रवाना
दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातच दहशतवाद्यांवर संकट...अबू सैफुल्लाहच्या खात्म्यानंतर आता तोयबाचा आणखी एक दहशतवादी आमिर हमझा गंभीर जखमी...
'ऑपरेशन सिंदूर'मुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळमार्गे कारवायांचा डाव...नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती...
यंदा सरासरीपेक्षा ७ ते १७ टक्के अधिक पावसाची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती, मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज...
पुणे, सोलापूर, रायगडसह राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं तर रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप, सततच्या पावसामुळे पिकांनाही फटका..





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
