Asim Munir Field Marshal promotion | भारतानं घुसून मारलं तरी, मुनीर 'फिल्ड मार्शल' Special Report
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानी लष्कराला धूळ चारली...तरीही पाकिस्तान्यांचा हेका गिरे तो भी टांग ऊपर असा आहे... कारण भारतासमोर गुडघे टेकणारा पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरलाच आता बढती देण्यात आलीय. जनरल असलेल्या असीम मुनीरला आता फिल्ड मार्शलची रँक देण्यात आलीय... पाहूयात शाहबाज सरकारच्या या अनोख्या करामतीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
जगात हसं करून घ्यायची एक संधी पाकिस्तान सोडत नाही...
भारताकडून चार दिवसांत बेदम चोप खाणाऱ्या पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल आसीम मुनीरचा, शाहबाज शरीफ सरकारने सन्मान केलाय..
आसीम मुनीर आता पाकिस्तानचा फिल्डमार्शल असणार आहे...
भारताने एलओसीवर पाकिस्तानी चौक्या फोडल्या... मुनीरची सेना गपगार पडली...
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्याचे पाकिस्तानातले तळ भारताने बेचिराख केले... मुनीरची सेना हात चोळत बसली..
भारतीय हवाई दलाच्या माऱ्यात पाकिस्तानचे ११ हवाई तळ बेचिराख झाले... मुनीरची एअर डिफेन्स सिस्टीम थंड बस्त्यातच बंद होती...
पाकिस्तानने सोडलेले सर्व ड्रोन्स, क्षेपणास्त्र भारताने पाडली... मुनीर तोंड वासून बघत बसला...
भारताने पार राजधानी इस्लामाबादपर्यंत मारा सुरू केल्यावर पाकिस्तानचे मुनीर मिया घाबरून जमिनीखालील बंकरमध्ये पळाले.
भारताच्या माऱ्याने पाकिस्तानी सैन्याची पळता भुई थोडी झाली. अनेक पाकिस्तानी सैनिक मारले. अनेक अधिकारी एलओसीवरून माघारी पळाले... मुनीरचा डीजीएमओ दाती तृण धरून भारताकडे हल्ले थांबवण्याची भीक मागू लागला...
असा हा पळपुटा... भारताला पाठ दाखवणारा... पाकिस्तानचा मिया मुनीर आता खांद्यावर फिल्ड मार्शलचे पाच स्टार्स मिरवणार आहे... तर पाकिस्तानचा वायुदल प्रमुख झहीर अहमद बाबरचाही कार्यकाळ वाढवला गेलाय.
विशेष म्हणजे मिया मुनीरच्या या कारनाम्यांची खिल्ली खुद्द पाकिस्तानातही उडवली जातेय.
जनरल मुनीर लष्करप्रमुख होण्याआधी त्याच्या कारस्थानी स्वभावामुळे पाकिस्तानातच अनेकदा कानफाटला गेलाय.
भारतात जालंधर इथे मुनीर यांच्या कुटुंबाचं मूळ आहे. पाकिस्तानात याआधी अयुब खान या लष्करशहाने स्वतःला फिल्ड मार्शल रँक दिली होती.. आता भारतासमोर गुडघे टेकल्याचं बक्षीस मुनीर यांनी शरीफ सरकारकडून मिळवलंय.
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
