Video : नाद करा पण पुणेकरांचा कुठं! दुचाकीच्या मार्गावर कार घातली अन् पुणेकर महिलेनं आडवी येत मागे घ्यायला भाग पाडलं!
Pune Viral Video : दुचाकीच्या पुलावर कार नेणाऱ्या चालकाला काकूंनी चांगला धडा शिकवलाय, याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी या काकूंना आपला पाठिंबा असल्याचंही म्हटलं आहे.

पुणे: पुणे शहर खोचक पाट्यांसोबतच अस्सल पुणेकरांच्या स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे. असाच एक किस्सा नुकताच डेक्कन परिसरात घडला आहे, जिथे एका पुणेरी काकूंनी वाहतूक नियम मोडणाऱ्या कार चालकाला जन्माचा धडा शिकवला आहे. हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची आणि काकूंची चर्चा होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
डेक्कन परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ यशवंतराव चव्हाण पूल आहे, जो फक्त दुचाकींसाठी आहे. मात्र, एका कारचालकाने या पुलावरून कार नेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या रस्त्यात असतानाच समोरून येणाऱ्या काकूंनी त्याला अडवले आणि "हा रस्ता फक्त दुचाकींसाठी आहे, कार मागे घ्या" असा दम भरला. कार चालकाने सुरुवातीला थोडा वेळ गोंधळून पाहिले, पण काकू हटण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे चालकाला अखेर नमते घ्यावे लागले आणि गाडी रिव्हर्स घेत पुलावरून मागे फिरावे लागले. विशेष म्हणजे काकूंनी केवळ इथेच न थांबता चालकाला मुख्य रस्त्यापर्यंत गाडी मागे नेण्यास भाग पाडले. डेक्कन परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ यशवंतराव चव्हाण पूल आहे, यशवंतराव चव्हाण पूल असं या पुलाचं नाव असून हा पूल अत्यंत छोटा असून फक्त दुचाकींसाठी या पुलावरून जाण्यासाठी परवानगी आहे. पण तरीही एका कार चालकानं या पुलावरुन आपली कार चालकानं डेक्कनकडून पुना हॉस्पिटलकडे नेण्याचा प्रयत्न केला. तो निम्म्यापर्यंत पोहोचला पण या ठिकाणी पायी निघालेल्या काकूंच्या समोरच त्याला थांबावं लागलं.
व्हायरल व्हिडिओ आणि नेटकऱ्यांचा प्रतिसाद
हा संपूर्ण प्रसंग एका दुचाकीस्वाराने आपल्या कॅमेऱ्यात टिपून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी काकूंच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. "जर वाहनचालकांना शिस्त पाळायची नसेल आणि पोलीस दुर्लक्ष करत असतील, तर आता नागरिकांनीच नियम मोडणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे" अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
पुणेरी महिलेचा नाद करायचा नाही.
— Brijmohan Patil (@brizpatil) March 1, 2025
यशवंतराव चव्हाण पूल दुचाकीस्वारांसाठी आहे, तरी ही कारवाला या पुलावर घुसला.
एक महिला त्याच्या आडवी आली आणि कार मागे घेण्यास भाग पाडले.#pune#पुणे pic.twitter.com/Y4Rvu825FU
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
