Special Report Pak and Modi :भारतानं कमावला जोश, पाकनं गमावला होश, पाकच्या पंतप्रधानांनी काय मिळवलं?
Special Report Pak and Modi :भारतानं कमावला जोश, पाकनं गमावला होश, पाकच्या पंतप्रधानांनी काय मिळवलं?
पाकिस्तानला चारीमुंड्या चित करणाऱ्या भारतीय जवानांचं आधी पंतप्रधान मोदींनी मनोबल उंचावलं. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहही काश्मीरमध्ये पोहोचले. अधिकारी आणि जवानांची भेट घेत संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत पाठीवर शाबासकी थाप दिली. यावेळी राजनाथ सिंहांनी खोटारड्या पाकिस्तानचे दावे खोडून काढत पाकिस्तान पुन्हा एकदा इशाराही दिला... पण दुसरीकडे पाकिस्तानमध्ये काय चित्र आहे? जाणून घेऊयात या रिपोर्टमधून
हे ही वाचा..
ऑपरेशन सिंदूरदमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव (India Pakistan Tension) शिगेला पोहोचलेला असताना चार दिवसांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यशस्वी मध्यस्थी करत शस्त्रसंधी घडवून आणल्याचं वक्तव्य केलं होतं. पण आता त्यांनी याच वक्तव्यावरून घुमजाव केला. भारत-पाकिस्तानमध्ये मी शस्त्रसंधी (India Pakistan Ceasefire) घडवून आणली नाही, पण तणाव निवळण्यास मदत केल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
आपण या दोन देशांमध्ये मध्यस्ती केली नाही, पण या दोन देशांदरम्यान जो तणाव निर्माण झाला होतो तो कमी करण्यास मदत केली असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. कतरमधील अमेरिकेच्या लष्करी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानास डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. या आधी जवळपास पाच वेळा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्ती केल्याचा दावा केला होता.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
