एक्स्प्लोर
RCB : आरसीबीचं टेन्शन मिटलं, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाबाबत मोठी अपडेट, विराट कोहलीचं 'ते' स्वप्न पूर्ण होणार
RCB : आयपीएलच्या उर्वरित पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिलासा मिळाला आहे. आरसीबीच्या संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पुन्हा दाखल होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिलासा
1/6

आयपीएल 2025 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळं स्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळं अनेक विदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशी गेले होते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीची लढत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात होणार असल्यानं त्या देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये परतणार का हा सवाल उपस्थित झाला होता.
2/6

आयपीएल 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. आरसीबी आणि केकेआर यांच्यात पहिली मॅच होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघामध्ये आयपीएल खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळं या संघांचे खेळाडू भारतात परतणार का असा सवाल निर्माण झाला होता.
3/6

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड आरसीबीकडून खेळण्यासाठी भारतात परतणार आहे. आरसीबीकडून त्याच्या भारतात परतण्यासाठी व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती स्पोर्टस्टारच्या सूत्रांनी दिली.
4/6

हेझलवुड खांद्याच्या दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर जाऊ शकतो, अशा चर्चा होत्या. मात्र, तो पुन्हा संघात दाखल होणार आहे.
5/6

जोश हेझलवुडनं आरसीबीसाठी 10 मॅचमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यातीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. हेझलवुड परत आल्यानं आरसीबीची विजेतेपद मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल होते का ते पाहावं लागेल.
6/6

विराट कोहली आरसीबीकडून 18 हंगाम खेळतोय. आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळालं नाही. यंदाच्या हंगामात आरसीबीला विजेतेपद मिळतं का ते पाहावं लागेल.
Published at : 15 May 2025 08:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
रायगड
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
