एक्स्प्लोर
NCP: अजित पवार-सुप्रिया सुळेंचा एकत्र फोटो, शरद पवारांना घातली साद; पुण्यातील डेक्कन परिसरातील बॅनर्स अचानक गायब, नेमकं काय घडलं?
NCP: आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं असा आशयाचा बॅनर पुण्यातील डेक्कन परिसरात लावण्यात आला होता.

NCP
1/5

पुण्यात राजकीय पक्षाचे बॅनर किंवा फ्लेक्स लावणं हे काही नवीन नाही. विविध पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक मजकूर असलेले फ्लेक्स उभारत असतात.
2/5

यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं असा आशयाचा बॅनर पुण्यातील डेक्कन परिसरात लावण्यात आला होता.
3/5

मात्र काही वेळातच तो बॅनर आता काढून टाकण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
4/5

यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांनी एक फ्लेक्स लावला, त्याची चर्चा सध्या सुरू आहे.
5/5

या फ्लेक्स वर सुप्रिया सुळे यांना "अजित दादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात" असा आशय लिहिण्यात आला आहे. तसेच "सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा" असं सुद्धा यावर लिहिण्यात आलं आहे.
Published at : 13 May 2025 01:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
लातूर
राजकारण
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
