एक्स्प्लोर

लातूरच्या उड्डाण पुलावर ट्रॅक्टर अन् ऑटोरिक्षाची जोरदार धडक; भीषण अपघातात 3 ठार 2 जखमी

शहरातील उड्डाणपुलावर ऑटो रिक्षाने ट्रॅक्टरला पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला, हा अपघात एवढा भीषण होता की ऑटो रिक्षा चक्काचूर झाला आहे.

लातूर : शहरातील लातूर-बार्शी रस्त्यावरील उड्डाणपुलावर आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांच्या (Police)मदतीने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, अपघात एवढा भीषण होता की रिक्षामधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूर (Latur) बार्शी रस्त्यावरील उड्डाणपुलावर ट्रॅक्टरला ऑटो रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

शहरातील उड्डाणपुलावर ऑटो रिक्षाने ट्रॅक्टरला पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला, हा अपघात एवढा भीषण होता की ऑटो रिक्षा चक्काचूर झाला आहे. या घटनेत ऑटो रिक्षामधील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. तर, एका प्रवाशाला किरकोळ मार लागला आहे. प्रतीक्षा संतोष पस्तापुरे (वय 10) राहणार बारा नंबर पाटी लातूर, सुमन सुरेश धोत्रे (वय 25) रा. सावेवाडी लातूर आणि शिवाजी दयानोबा कटलाकुटे (वय 62) वर्ष राहणार बारा नंबर पाटी लातूर, अशी या अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील दोन गंभीर जखमी रुग्णावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या दोघांना डोक्याला जबर मार लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, घटनेची माहिती कळताच यातील मृत आणि अपघातग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. 

हेही वाचा

पॉलिटेक्निकच्या प्रवेशाची तारीख जाहीर, ऑनलाईन प्रक्रियेसाठी संकेतस्थळाला द्या भेट; मंत्रीमहोदयांचं आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime : शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP News Vastap Episode :  संपवण्याचा नाही तर एकमेकांना टीकवण्याचा प्रयत्न, पवारांमध्ये पडद्यामागे काय घडतय?AC Temperature Rules : एसी तापमानाच्या नियमांमध्ये बदल; २० ते २८ डिग्री सेल्सियसपर्यंत मर्यादाABP Majha Headlines 9 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा रात्री 9 च्या हेडलाईन्सJob Majha : 10 June 2025 : भारत पेट्रोलियम येथे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग पदाकरीत भरती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime : शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
IAS Transfer : आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली
भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली
वेस्ट इंडिजच्या तुफानी निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांसाठी भावुक पोस्ट
वेस्ट इंडिजच्या तुफानी निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांसाठी भावुक पोस्ट
देशात 2014 नंतर भ्रष्टाचाराची हिंमत कोणी केली नाही, मोदींवर एक डाग नाही; एकनाथ शिंदेंकडून स्तुतीसुमने
देशात 2014 नंतर भ्रष्टाचाराची हिंमत कोणी केली नाही, मोदींवर एक डाग नाही; एकनाथ शिंदेंकडून स्तुतीसुमने
Embed widget
OSZAR »