एक्स्प्लोर
Pimpri Chinchwad News: इंद्रायणीच्या प्रवाहातील 36 बंगल्यावर बुलडोझर चालले, कोट्यवधींचे अलिशान बंगले पत्त्यासारखे कोसळले
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या पूररेषेत उभारण्यात आलेले 36 बंगले तोडायला पालिकेने सुरुवात केली आहे. बुलडोझरने जोरदार कारवाई

Pimpri Chinchwad illegal bungalow
1/10

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकादेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला आहे, त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत, 31 मे पूर्वी ही नदीपात्रातील बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. आज या बंगल्यांच्या तोडकामाला महानगरपालिकेने प्रारंभ केला.
2/10

पालिकेच्या पथकांनी अनेक बुलडोझर आणून एकाचवेळी 29 बंगल्यांच्या तोडकामाला प्रारंभ केला.
3/10

या तोडकामामुळे चिखली परिसरात उद्ध्वस्त झालेले बंगले दिसत आहेत. हे दृश्य गाझा पट्टीतील उद्ध्वस्त इमारतींसारखे दिसत आहे.
4/10

रिव्हर व्हीला प्रोजेक्ट मध्ये एकूण 36 बंगले आहेत. पैकी 29 रहिवाशी न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने मात्र बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले, त्यामुळं आता या प्रोजेक्ट मधील 36 ही बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु आहे.
5/10

सकाळी 8 पर्यंत 25 टक्के काम ही पूर्ण झालं आहे. उर्वरित 75 टक्के काम आजचं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.
6/10

इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत (flood line) मधील 29 बंगल्यावर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली आहे. पहाटे पासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली आहे. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जात आहेत.
7/10

चिखलीतील सर्व्हे नंबर 90 मध्ये बंगलो प्लॉट बांधकाम प्रकल्प करण्यात आला होता. हे प्लॉटिंग मे. जरे वर्ल्ड आणि इतरांचं आहे. महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात ही बांधकामे करण्यात येत होती. या बांधकामामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आणून पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. संबंधित विकासकांनी पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन झाले होते.
8/10

स्वप्नातलं घर पै-पै जमा करुन उभारलेलं असतं, पण तेच घर डोळ्यादेखत बेचिराख झालं तर? पिंपरी चिंचवड मधील 36 बंगले मालकांवर ही वेळ आलीये. चिखलीत इंद्रायणी नदीच्या पुररेषेत ही बंगले उभारण्यात आले होते. या बंगल्यावर कारवाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, मनोज जरे नामक विकासकाने आम्हाला हा प्लॉट रहिवाशी असल्याचं दाखवलं, त्यापुढे याचा दस्त कसा काय झाला? बांधकाम होत असताना पालिका अधिकाऱ्यांनी परवानगी देण्याच्या नावाखाली पैसे घेतले, असे आरोप रहिवाश्यांनी लावलेत
9/10

महापालिकेला ही बांधकामे आता 31 मेपूर्वीच पाडावी लागणार आहेत. हरित लवादाने हे बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेले होते.
10/10

सध्या चिखली परिसरात हे 29 बंगले पाडण्यासाठी जोरदार कारवाई सुरु आहे.
Published at : 17 May 2025 10:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
अकोला
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
