एक्स्प्लोर
Nashik Accident: नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाताना भीषण अपघात, पीकअप पलटी, 27 भाविक जखमी
जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अधिक तपास वणी पोलीस करत आहेत.

Nashik Accident
1/7

नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत सुमारे 27 भाविक जखमी झाले आहेत.
2/7

बुलढाणा जिल्ह्यातून सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा बोलेरो पिकअप वाहन वणी गडाच्या चढत असताना पलटी झाला.
3/7

अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात लहान मुले, महिला आणि जेष्ठ नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत.
4/7

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी भाविकांना तत्काळ उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
5/7

प्राथमिक माहितीनुसार, वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
6/7

दरम्यान, सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. यामुळे दरवर्षी या भागात वाहनांची व भाविकांची मोठी वर्दळ असते. यावेळीही गर्दीमुळे व रस्त्यावरील अरुंद वळणांमुळे अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जातेय.
7/7

अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी स्थानिकांनी पलटी झालेल्या पिकअपमधून भाविकांना बाहेर काढले. जीवित हानी टळली असली तरी 27 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
Published at : 29 Apr 2025 12:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
ठाणे
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
