एक्स्प्लोर
वैष्णवीच्या वडिलांनी अजित दादांच्याहस्ते दिलेली चावी; फॉर्च्युनर अन् ॲक्टिव्हा पोलिसांकडून जप्त
पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त होत आहे.

Vaishnavi hagwane fortuner police sized
1/9

पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त होत आहे.
2/9

वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोपी तिच्या पालकांनी केला आहे. आमच्या मुलीचा छळ झाल्यानेच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं
3/9

वैष्णवीला लग्नात 51 तोळे सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्यूनर कारही भेट दिली होती, पण तरीही सासरच्यांकडून आणखी पैशांची मागणी करत तिचा जाच करण्यात आल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
4/9

राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांचा मुलगा शुभम हाही सध्या फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचेही वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
5/9

दरम्यान, एकीकडे आरोपींचा शोध सुरू असताना दुसरीकडे पोलीस राजेंद्र हगवणे यांच्याघरी पोहोचले आहेत, पोलिसांनी हगवणे यांच्याकडे असलेली फॉर्च्युनर जप्त केली आहे. MH 14 KU 2002 हा फॉर्च्यूनर गाडीचा नंबर आहे.
6/9

पोलिसांनी मुळशीतील घरी जाऊन वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिव्हा गाडी जप्त केली आहे. पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर कारचा नंबर MH 14 KU 2002 हा फॉर्च्यूनर गाडीचा नंबर आहे.
7/9

वैष्णवीला नेमका काय जाच झाला हे तिने एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं, त्याची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे. त्यामध्ये, तीने सासरच्यांनी जाच केल्याचं म्हटलं आहे.
8/9

आई-वडिलांना विरोध करुन शशांक सोबत प्रेम विवाह केला, ही माझी आयुष्यातील मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरचं मी घटस्फोट घेणार आहे. असं वैष्णवीने मैत्रिणीसोबत व्हॉट्सअपवर बोलताना सांगितलं होतं
9/9

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याचहस्ते वैष्णवीच्या वडिलांतर्फे शुभम हगवणे यांना फॉर्च्युनरची चावी देण्यात आली होती, तो फोटोही समोर आला आहे.
Published at : 21 May 2025 04:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
बॉलीवूड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
