एक्स्प्लोर
तुला काय सोनं लागलंय का? वामिका गब्बीच्या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Actress Wamiqa Gabbi : अभिनेत्री वामिका गब्बीच्य नव्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

wamika gabbi
1/8

Actress Wamiqa Gabbi :भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकार असे असतात, जे आपल्या अभिनयाच्या बळावर अनेक भाषांमध्ये आपली ओळख निर्माण करतात. अशीच एक प्रतिभावान आणि बहुभाषिक अभिनेत्री म्हणजे वामिका गब्बी.
2/8

तिने पंजाबी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने विशेष स्थान प्राप्त केले आहे. सौंदर्य, अभिनय कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर वामिकाने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे.
3/8

वामिका गब्बीचा जन्म 29 सप्टेंबर 1993 रोजी चंदीगड येथे एका साहित्यप्रेमी कुटुंबात झाला. तिचे वडील गोवर्धन गब्बी हे एक लेखक असून, तिच्यावर साहित्यिक वातावरणाचा प्रभाव लहानपणापासूनच होता.
4/8

तिचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल, चंदीगड येथे झाले आणि तिने डीएव्ही कॉलेज येथून कला शाखेत पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आणि नृत्याची विशेष आवड होती.
5/8

वामिकाने केवळ 13 व्या वर्षी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट होता 'जब वी मेट' (२००७), ज्यामध्ये तिने करीना कपूरच्या चुलत बहिणीची छोटी भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि तिला पुढील संधी मिळू लागल्या.
6/8

वामिकाने पंजाबी चित्रपटसृष्टीतून नायक-नायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिचा 'तू मेरा 22 मैं तेरा 22' (2013) हा चित्रपट यशस्वी ठरला आणि त्यानंतर तिने 'निक्का जैलदार' मालिका, 'इश्क ब्रांडी', 'गोलक बुगनी बँक ते बटुआ' अशा अनेक चित्रपटांत काम केले.
7/8

मल्याळम चित्रपट 'गोधा' (2017) मध्ये तिने कुस्तीपटूची भूमिका साकारून समीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. याच चित्रपटासाठी तिला 'बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेस' पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांतही काम केले.
8/8

OTT प्लॅटफॉर्मवर वामिकाचा झगमगता तारा दिसून आला. 'ग्रहन', 'माई', 'मॉडर्न लव्ह मुंबई' आणि विशेषतः 'जुबिली' या सिरीजमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. २०२३ साली आलेल्या 'खुफिया' या स्पाय थ्रिलर चित्रपटात वामिकाने गुप्तहेराच्या पत्नीची भूमिका केली, ज्यासाठी तिला फिल्मफेअर OTT पुरस्कार मिळाला.
Published at : 17 May 2025 06:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धुळे
क्रीडा
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
