Team India Test Squad: प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे! करुण नायरची इच्छा पूर्ण झाली, इंग्लंडविरुद्धच्या भारतीय कसोटी संघात संधी
Team India: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.

Team India Test Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीने शनिवारी दुपारी 18 जणांचा भारताचा कसोटी संघ जाहीर केला. या संघाचे कर्णधारपद शुभमन गिल (Shubhman Gill) तर उप कर्णधारपद ऋषभ पंत यांच्याकडे असेल. या कसोटी संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या करुण नायर याला संधी मिळाली आहे.
करुण नायर हा मूळचा कर्नाटकचा खेळाडू, यापूर्वी त्यानं आयपीएलमध्ये 2018 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दरम्यानच्या काळात त्याचा फॉर्म चांगला नसल्यानं 2022 नंतरच्या हंगामात त्याला स्थान मिळालं नाही. कर्नाटकनं रणजीच्या संघात देखील स्थान दिलं नाही. यानंतर करुण नायरनं विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विदर्भाला त्यानं रणजीचं विजेतेपद मिळवून दिलं. या कामगिरीच्या जोरावर करुण नायरसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा उघडले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करुण नायरला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. करुण नायरनं मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई सुरु केली. मुंबईचा आणि टीम इंडियाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जोरदार धुलाई करत धावा काढल्या. करुण नायरनं बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार मारले.
आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर करुण नायरचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये तो "प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे...," असं म्हणाला होता. गेल्या काही महिन्यांत करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने करुण नायरला आयपीएलच्या लिलावात 50 लाख रुपयांना खरेदी केले होते. आता त्याला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात करुण नायर कशाप्रकारे फलंदाजी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत तंत्रशुद्ध फलंदाजी करणाऱ्या करुण नायर याच्यावर मोठी जबाबदारी असेल.
Team India: इंग्लंड दौऱ्यातील भारतीय कसोटी संघात कोण-कोण?
शुभमन गिल, कर्णधार
यशस्वी जयस्वाल (फलंदाज)
करुण नायर (फलंदाज)
रवींद्र जाडेजा (अष्टपैलू)
वॉशिंग्टन सुंदर (अष्टपैलू)
शार्दुल ठाकूर (अष्टपैलू)
जसप्रीत बुमराह (गोलंदाज)
मोहम्मद सिराज (गोलंदाज)
आकाश दीप (गोलंदाज)
कुलदीप यादव (गोलंदाज)
के एल राहुल (फलंदाज)
साई सुदर्शन (फलंदाज)
अभिमन्यू ईश्वरन (फलंदाज)
ध्रुव जुरेल (गोलंदाज)
प्रसिद्ध कृष्णा (गोलंदाज)
अर्शदीप सिंग (गोलंदाज)
नितीश कुमार रेड्डी (अष्टपैलू)
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
