एक्स्प्लोर
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांचं वेगळं पाऊल, 6450 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री, भारतीय गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली अन्...
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये 1,21,414 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. तर, भारतीय गुंतवणूकदारांनी 275264 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केलेत.

बिझनेस न्यूज
1/6

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 30 मे रोजी 6450 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 9095 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले.
2/6

शुक्रवारी बाजार सुरु असताना देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 20673 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले तर 11577 कोटी रुपयांचे शेअर विकले. तर, दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी 44434 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले तर 50884कोटी रुपयांचे शेअर विकले.
3/6

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 121414 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 275264 कोटी शेअरची खरेदी केली.
4/6

शुक्रवारी निफ्टी 50 निर्देशांक 24751 अंकांवर घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 182 अंकांच्या घसरणीसह 81451.01 अंकावर बंद झाला. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकात घसरण झाली.
5/6

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलचे रिसर्च हेड, वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका यांच्या मते देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानं दिलासा मिळाला. चौथ्या तिमाहीत भारताचा ग्रोथ रेट 7.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.
6/6

जागतिक पातळीवर आर्थिक विकासासंदर्भात चिंता कायम आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. फेड रिझर्व्हच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. येत्या आठवड्यात रेपो रेट मध्ये कपात होण्याची शक्यता असल्यानं बँकांच्या स्टॉकवर लक्ष असेल. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 31 May 2025 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
