एक्स्प्लोर

Sudharkar Badgujar : सुधाकर बडगजूर यांच्या भाजपप्रवेशाबाबत बावनकुळे अंधारात,म्हणाले मला माहिती नाही

Sudhakar Badgujar in BJP: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर 'मनपरिवर्तन' होऊन ठाकरे गटात नाराज असल्याचा प्रबळ आंतरिक जाणीव झालेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप (BJP) मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यासाठी सुधाकर बडगुजर मंगळवारी सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, आता त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चक्रावून टाकणारे विधान केले आहे.  सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आज सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी करुन मुंबईला निघालेल्या सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकला नाही तर त्यांच्यासाठी ती मोठी नामुष्की ठरेल.

 

 

नागपूर व्हिडीओ

Sudharkar Badgujar : सुधाकर बडगजूर यांच्या भाजपप्रवेशाबाबत बावनकुळे अंधारात,म्हणाले मला माहिती नाही
Sudharkar Badgujar : सुधाकर बडगजूर यांच्या भाजपप्रवेशाबाबत बावनकुळे अंधारात,म्हणाले मला माहिती नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Investment Idea : SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics : भाजपचं शतक, कुणाची विकेट? ठाकरेंच्या शिवसेनेत गळती, महायुतीत भरती Special Report
Devendra Fadanvis On Kumbh : कुंभमेळ्यासाठी विस्तारित रस्ते नेटवर्क, नाशिक रिंग रोड मंजूर - फडणवीस
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचे राजकीय निवृतीचे संकेत, 'आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबण्याची वेळ' - जाधव
ABP Majha Headlines : 08 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ranjan Taware on Ajit Pawar : अजित पवारांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,रंजनकुमार तावरेंचा घणाघात!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Investment Idea : SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून  2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून  2025 | रविवार
Embed widget
OSZAR »