एक्स्प्लोर

राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 

मी कुठल्याही दादा, भाईला भीक घालत नाही. ते फक्त लांबूनच भाषण करतात, असे वक्तव्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दंड थोपटलेत.

Bhaskar Jadhav : मी कुठल्याही दादा, भाईला भीक घालत नाही. ते फक्त लांबूनच भाषण करतात, असे वक्तव्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दंड थोपटलेत. शिवसेनेचे गत वैभव पुन्हा कस येत नाही ते बघतोच. सुरुवात सिंधुदुर्गमधूनच करणार असल्याचा एल्गार भास्कर जाधव यांनी केला. चिपूळूनमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या शाखा प्रमुखांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. 

राज्यात सरकार कोणाचेही असो मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच जिंकेल असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गपासून सुरुवात करणार असल्याचे जाधव म्हणाले. शिवसेनेचे पुन्हा गतवैभव येत नाही ते बघतो असेही ते म्हणाले. तुम्ही सर्वजण सोबत राहा असेही जाधव म्हणाले. उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत आहे. तालुकाप्रमुखांनी मिटींग घ्यायला सुरुवात करा असे जाधव म्हणाले. आपल्या निवडणुकी जिंकायचे आहे असेही भास्कर जाधव म्हणाले. 

माझ्या विरोधात प्रचंड पैशांचा वापर झाला, पोलिसांच्या गाडीतून पैसे आले

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उभी करण्यात शाखाप्रमुखांच सर्वात मोठं योगदान आहे. आज शाखाप्रमुख कार्यरत दिसत नाहीत अशी खंत देखील भास्कर जाधवांनी व्यक्त केली. शाखा प्रमुख सतर्क असते तर राज्यात चित्र वेगळं असतं असेही भास्कर जाधव म्हणाले. माझ्या विरोधात प्रचंड पैशांचा वापर झाला. पोलिसांच्या गाडीतून पैसे आल्याचा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केला. EVM मशीन बाबत सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधातही भास्कर जाधवांनी भाष्य केलं. सरकारने काळं काम केलं हे स्पष्ट आहे. आपण हरलेलो नाही असेही ते म्हणाले. 

 24 तासात युद्ध का थांबवलं? भास्कर जाधवांचा पंतप्रधान मोदींना सवाल 

यावेळी बोलताना भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर रक्तात सिंदुर वाहत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भास्कर जाधवांनी समाचार घेतला. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी पंतप्रधान मोदी यांनी घालवल्याचेही भास्कर जाधव म्हणाले. 26 महिलांचे कपाळ उजाड करणारे ते आतंकवादी कुठे आहेत? असा खडा सवाल भास्कर जाधव यांनी केला. 24 तासात युद्ध का थांबवलं? असा सवालही भास्कर जाधव यांनी केला. चार महिन्यात महाराष्ट्रात 4 लाख 60 हजार मतदान वाढलं कोठून? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. त्यानंतर सरकारनं कायदा केलाय की, 45 दिवसानंतर ईव्हीएम ठेवायच्या नाहीत. त्या नाहीशा करायच्या. सरकारनं काळ काम केलं आहे. आपण हरलो नाही असे भास्कर जाधव म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

आता थांबायचा विचार करावा; भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, संजय राऊतांवरही स्पष्टच बोलले

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका
अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका
Maharashtra Weather Update: मुंबई ठाण्यासह कोकणपट्ट्यात तुफान पावसाची शक्यता, 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा हवामान अंदाज काय?
मुंबई ठाण्यासह कोकणपट्ट्यात तुफान पावसाची शक्यता, 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा हवामान अंदाज काय?
NASA Axiom Mission Launch Shubhanshu Shukla: शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले; तब्बल 41 वर्षांनी भारतीयाचे अंतराळात पाऊल; Axiom-4 मिशन नेमकं काय, भारतासाठी किती महत्त्वाचं?
शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले; तब्बल 41 वर्षांनी भारतीयाचे अंतराळात पाऊल; Axiom-4 मिशन नेमकं काय, भारतासाठी किती महत्त्वाचं?
Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टी, 56 बंधारे पाण्याखाली; तीन लघू प्रकल्प 100 टक्के भरले, कळंबा तलावही जूनमध्येच ओव्हरफ्लो
कोल्हापूर जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टी, 56 बंधारे पाण्याखाली; तीन लघू प्रकल्प 100 टक्के भरले, कळंबा तलावही जूनमध्येच ओव्हरफ्लो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका
अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका
Maharashtra Weather Update: मुंबई ठाण्यासह कोकणपट्ट्यात तुफान पावसाची शक्यता, 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा हवामान अंदाज काय?
मुंबई ठाण्यासह कोकणपट्ट्यात तुफान पावसाची शक्यता, 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा हवामान अंदाज काय?
NASA Axiom Mission Launch Shubhanshu Shukla: शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले; तब्बल 41 वर्षांनी भारतीयाचे अंतराळात पाऊल; Axiom-4 मिशन नेमकं काय, भारतासाठी किती महत्त्वाचं?
शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले; तब्बल 41 वर्षांनी भारतीयाचे अंतराळात पाऊल; Axiom-4 मिशन नेमकं काय, भारतासाठी किती महत्त्वाचं?
Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टी, 56 बंधारे पाण्याखाली; तीन लघू प्रकल्प 100 टक्के भरले, कळंबा तलावही जूनमध्येच ओव्हरफ्लो
कोल्हापूर जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टी, 56 बंधारे पाण्याखाली; तीन लघू प्रकल्प 100 टक्के भरले, कळंबा तलावही जूनमध्येच ओव्हरफ्लो
ही प्रतिभा दुसऱ्या कोणाकडेही नाही, तो त्याच्या आवाजाने बरे करायचा आजार! रियाज करताना मृत्यूने गाठलं
ही प्रतिभा दुसऱ्या कोणाकडेही नाही, तो त्याच्या आवाजाने बरे करायचा आजार! रियाज करताना मृत्यूने गाठलं
Malegaon Election Result 2025: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील एकांडा शिलेदार, 35 वेळा पडला पण हिंमत सोडली नाही, शिवाजी कोकरेंची जोरदार चर्चा
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील एकांडा शिलेदार, 35 वेळा पडला पण हिंमत सोडली नाही, शिवाजी कोकरेंची जोरदार चर्चा
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडण्याचा दावा करणारा पाकिस्तानी लष्कराचा अधिकारीच चकमकीत ठार!
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडण्याचा दावा करणारा पाकिस्तानी लष्कराचा अधिकारीच चकमकीत ठार!
Pune Crime news: पिंपरी-चिंचवडमध्ये नवऱ्याने बायकोला प्रियकारासह पाहिलं, डोक्यात संतापाची तिडीक गेली, रस्त्यावरच्या पेव्हर ब्लॉकने दोघांना संपवलं
पिंपरी-चिंचवडमध्ये नवऱ्याने बायकोला प्रियकारासह पाहिलं, डोक्यात संतापाची तिडीक गेली, रस्त्यावरच्या पेव्हर ब्लॉकने दोघांना संपवलं
Embed widget
OSZAR »