ABP Majha Marathi News Headlines 3PM Top Headlines 3 PM 08 April 2025
संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा, गुहागरमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरुन कोटी... संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार...
राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकाससेनेची मागणी, उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असल्याचा याचिकेत दावा...
मंगेशकर रुग्णालयाकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही याचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू, पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठातांना पत्र...
२२ कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस... तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महापालिकेनं सर्व खासगी रुग्णालयांना बजावलं...
'फुले' चित्रपट राज्यातील जातीय वाद वाढवणार, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आरोप, काही दृश्यांवर आक्षेप, सिनेमा सर्वसमावेशक असावा, दवेंचं आवाहन
कल्याणमधील शक्तिधाम प्रसूतिगृहात महिलेचा मृत्यू, डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबीयांचा आरोप...तर खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा दावा...
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी २९ तारखेला पुढील सुनावणी... बदलापूरप्रमाणे कोर्टाच्या अधिपत्याखाली टीम नेमून सखोल चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांचा मागणी
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार,३० एप्रिलला पैसे होणार जमा, लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष
एमएमआरडीए प्रकल्पांसाठी ४ लाख ७ हजार कोटींचा निधी, इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती...
कृत्रिम वाळू तयार करून सरकारी बांधकामांसाठी वापरणार... मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती...तर मागणी एवढा वाळू पुरवठा करण्यावर अधिक भर असल्याचं स्पष्ट
((तर सिंधी वसाहती यापुढे क्लास वनमध्ये वर्गीकृत होणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय))
खोक्याची पत्नी तेजू भोसले घेणार अजित पवारांची भेट... वनविभागानं घरावर केलेल्या कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात चर्चा करणार...
दौलताबादमध्ये देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग, वाळलेलं गवत पेटलं, किल्ल्याच्या चारही बाजूंनी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट
सोन्या-चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा, सोनं तीन दिवसांत तीन हजार रुपयांनी स्वस्त...जीएसटीसह सोन्याचा दर ९१ हजारांवर
अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात, ६४ वर्षांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये...
चैत्री एकादशीनिमित्त पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
