Pooja Khedkar Exclusive : पूजा खेडकरनं महागड्या गाड्या कश्या खरेदी केल्या?
Pooja Khedkar Exclusive : पूजा खेडकरनं महागड्या गाड्या कश्या खरेदी केल्या?
पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात 3 जूनला रुजू झाल्या होत्या. पूजा खेडकर यांच्या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागानं 6 सप्टेंबरला भारतीय प्रशासकीय सेवा (प्रशिक्षणार्थी) नियम 1954 च्या कलम 12 नुसार पूजा खेडकर यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. नियम 12 नुसार केंद्र सरकारला प्रोबेशनवर असलेल्या आयएएसना सेवेतून बडतर्फ करण्याचा अधिकार आहे.
पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राबाबतचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर यूपीएससीनं त्यांच्यावर कारवाई केली होती. त्याशिवाय केंद्र सरकारनं एक सदस्यीय समिती देखील स्थापन केली होती. पूजा खेडकर यांनी आयएएससाठी पात्र असल्याचे केलेले दावे याची पडताळणी करुन आणि महाराष्ट्र सरकारच्या समितीनं डीओपीटी सचिवांना 24 जुलै रोजी सादर केलेला अहवाल याच्या आधारे पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडचर्फ करण्यात आलं.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
