AICWA boycott Turkey तुर्की, अझरबैजानवर सिनेसृष्टीचा बहिष्कार, रुपेरी पडद्यावरुन 'तुर्की' होणार गायब
भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात तुर्की, अझरबैजान सरळ सरळ पाकिस्तानच्या बाजुनं उभं राहिले. त्याचा सर्व स्तरातून निषेध झालाच. या देशात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी बुकिंग्ज कॅन्सल तर केलीच पण त्याचबरोबर इथून पुढे तुर्की किंवा अझरबैजानमध्ये कोणत्याही भारतीय सिनेमाचं शूटिंग होणार नाही अशी भूमिका सिनेवर्कर्स असोशिएनने घेतलीय. यातून योग्य तो धडा तुर्कीला शिकवला जाईलच पण या निमित्तानं भारतीय सिनेमे शूटिंगसाठी तुर्की पर्यंत कसे पोहोचले... कश्मिर ते तुर्की व्हाया युरोपियन देश हा प्रवास कसा घडला यावरचाच एक खास रिपोर्ट आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी.
काश्मीर… भारताचं नंदनवन… सौंदर्य म्हणजे नेमकं काय याचं उत्तर म्हणजे ही भूमी… हेच सौंदर्य तितक्याच नजाकतीनं टिपलं ते बॉलिवुडच्या कॅमेऱ्यानं… कथेतलं प्रेम इथं बहरलं… श्रवणीय संगीताला इथल्या चित्रचौकटींनी प्रेक्षणीय केलं… आणि हे काश्मीर कोट्यवधी डोळ्यांना सुखावून गेलं…
राजेश खन्नाचा आप की कसम, ऋषी कपुरचा बॉबी, अमिताभ, जया बच्चन आणि रेखाचा सिलसिला अशा कितीतरी सिनेमांमधून दिसलेलं काश्मीर त्या सिनेमातलं पात्र बनलं… ओळख बनलं… बॉबी सिनेमात दिसलेलं घर तर आजही बॉबी हट म्हणूनच ओळखलं जातं…
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
