एक्स्प्लोर
Mumbai: केंद्र सरकारविरोधात उबाठा आक्रमक, तिरडी यात्रा काढत विक्रोळीत जोरदार घोषणाबाजी Photos
केंद्र सरकारच्या विविध धोरणांवरून एसटी प्रवासात महिलांना व ज्येष्ठांना अजूनही सवलत नाही अशा विविध मागण्या साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कडून आंदोलन करण्यात आले.

UBT tirdi yatra
1/7

केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने विक्रोळीमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं. विक्रोळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केंद्र सरकारची तीरडी यात्रा काढण्यात आली.
2/7

घरगुती गॅस सिलेंडरचे वाढलेले दर, पेट्रोल-डिझेल महागाई, शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळणं, तसेच 'लाडकी बहिण' योजनेअंतर्गत अजूनही २१०० रुपये न मिळणं यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं.
3/7

आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. यावेळी त्यांनी सरकारच्या महागाईविरोधी धोरणांवर सडकून टीका केली.
4/7

एसटी प्रवासात महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत अजूनही लागू करण्यात आली नाही, याचाही मुद्दा आंदोलनात उपस्थित करण्यात आला.
5/7

सुनील राऊत म्हणाले, “हे सरकार जनतेच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. आम्ही हे सरकार जनतेसमोर उघडं पाडणार आहोत. जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर आवाज उठवणं हेच आमचं काम आहे, आणि ते आम्ही करत राहू.”
6/7

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या तीव्र आंदोलनामुळे केंद्र सरकारविरोधात संतापाचा सूर अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र आहे.
7/7

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात उबाठा गटाकडून जाेरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Published at : 09 Apr 2025 07:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
अकोला
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
