एक्स्प्लोर
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: भक्तांच्या वचनपूर्तीसाठी घडणार रहस्यमय 'स्वामी लीला'; जय जय स्वामी समर्थमध्ये दिसणार वचनपूर्तीचा प्रवास
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी भक्ताच्या वचनपूर्तीसाठी कसे मार्गदर्शन करतात याचा प्रत्यय या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार आहे.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track
1/9

दत्तभक्त उर्मिलाच्या आयुष्यात घडणाऱ्या एका अनोख्या आणि रहस्यमय लीलेमुळे तिच्या जीवनात मोठा वळण येणार आहे.
2/9

महागुरुवारच्या विशेष भागात उर्मिलाच्या हातून अर्धवट राहिलेलं एक वचन पूर्ण करण्यासाठी स्वामी स्वतः प्रकट होणार आहेत.
3/9

परिस्थितीनं उर्मिलाला एका अवघड वळणावर आणून ठेवले असताना, तिच्या आयुष्यात स्वामींच्या आगमनाने एक गूढ लीला उलगडणार आहे.
4/9

घराच्या उंबरठ्यावर उर्मिलाचं आयुष्य एका कठीण निर्णयाच्या टोकावर उभं असताना, अंबरीश आणि अनुसयाचा तिरस्काराचा कटू स्वभाव तिला अजून खोल जखमा देतो.
5/9

मात्र स्वामींच्या शब्दांनी तिच्या आयुष्यात आशेचा नवा किरण जागवतो.
6/9

स्वामींचं 'प्रवेश कर घरात' हे वाक्य ऐकून उर्मिला पाऊल टाकते आणि लगेचच निसर्गाच्या गूढ शक्तींचं आगळंवेगळं रूप प्रकट होतं.
7/9

या क्षणाला उर्मिलाच्या समोर येणारा गूढ आवाज - "मला दिलेले वचन पूर्ण कर" - तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो.
8/9

मात्र स्वामींचं स्पष्ट मार्गदर्शन तिला नवी दिशा दाखवणार आहे.
9/9

या लीलेचा उलगडा आणि उर्मिलाच्या वचनपूर्तीचा प्रवास पाहायला विसरू नका. महागुरुवार 24 एप्रिलच्या भागात आपल्या कलर्स मराठीवर.
Published at : 22 Apr 2025 11:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
