Vaishnavi Hagwane Audio Clip : वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वीची ऑडिओ क्लिप व्हायरल
Vaishnavi Hagwane Audio Clip : वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वीची ऑडिओ क्लिप व्हायरल
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सध्या फरार असून वैष्णवीच्या वडिलांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडा आणि पैशांची मागणी करत हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचा जाच करण्यात आल्यानेच तिने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोपी वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी, पुण्यातील (Pune) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राजेंद्र हगवणे (Rajendra hagvane) आणि त्यांचा मुलगा शुभम हगवणे फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून आता स्वत: वैष्णवीचा तिच्या मैत्रिणीसोबतचा संवाद एबीपी माझाच्या हाती लागला आहे. वैष्णवीने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास तिच्याशी बोलून दाखवला. विशेष म्हणजे वैष्णवीचं लग्न प्रेमविवाह होता, पण हीच माझी सर्वात मोठी चूक असल्याचं तिने म्हटलं आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
