एक्स्प्लोर
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण,मुंबई अन् नवी दिल्लीत सोन्याचे दर किती रुपयांपर्यंत पोहोचले?
Gold Rate Today : सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण सुरु आहे. सोने अन् चांदीच्या दरावर ट्रेड वॉरचा परिणाम झालाय.

सोने दर अपडेट
1/6

सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण कायम आहे. सोने आणि चांदीच्या दरात आज देखील घसरण झाली. सोन्याचे दर कालच्या तुलनेत 400 रुपयांनी घसरले. चांदीचे दर 93900 रुपये किलोवर आले आहेत. आज चांदीचे दर देखील घसरले आहेत.
2/6

नवी दिल्लीत 22 कॅरट सोन्याचा दर 82990 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90650 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 82840 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 90370 रुपये इतका आहे.
3/6

अमेरिकेनं विविध देशांवर लादलेल्या टॅरिफ आणि ट्रेड वॉरमुळं सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. आजच्या बाजाराच्या सकाळच्या सत्रात सोने दरात 1600 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. यामुळं गंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलं.
4/6

तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदार दुसरीकडे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी सोने विक्री करतात.यामुळं सोने दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतं.
5/6

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3163 डॉलर प्रति औंसवरुन 3100 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. भारतात सोन्याचे दर दररोज बदलतात. जागतिक दर, कर, शुल्क आणि रुपयाच्या किमतीवर सोन्याचे दर ठरतात.
6/6

भारतात सोन्याचे दर काही कारणांमुळं बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारचा कर, रुपयाच्या किमतीमधील चढ उतार यामुळं दर बदलतात. भारतात सोने गुंतवणुकीचं माध्यम नाही. भारतातील परंपरा आणि सणांचा प्रमुख भाग आहे. लग्नसराई आणि सणांच्या काळात सोन्याचे दर वाढतात.
Published at : 08 Apr 2025 08:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
