एक्स्प्लोर
SIP : एसआयपी ऐनवेळी बंद केल्यानं अनेकांचं आर्थिक नुकसान, 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या
SIP : कधी कधी म्युच्युअल फंड त्यांचा उद्देश नफा मिळवण्यासाठी बदलतो. त्यावेळी नवा उद्देश तुमच्या वैयक्तिक गोल्स सोबत मिळते जुळते नसतील तर एसआयपीमधून बाहेर पडणं चांगलं.

म्युच्युअल फंड एसआयपी
1/7

अनेकदा शेअर मार्केट मध्ये घसरण झालेली असते, कमी परतावा मिळत असतो किंवा आर्थिक चणचण असते तेव्हा एसआयपी बंद करण्याचा विचार लोकं करतात. मात्र, एसआयपी बंद करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.
2/7

जर तुमचं आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झालं असेल, म्हणजेच मुलांचं शिक्षण, घराची खरेदी, निवृत्ती योजना तर एसआयपी बंद करणं योग्य असू शकतं. यापैकी एक जरी उद्देश अपूर्ण असेल तर एसआयपी सुरु ठेवणं महत्त्वाचं आहे.
3/7

तुमचा फंड त्याच्या सारख्याच इतर फंडच्या तुलनेत कामगिरी समाधानकारक करत नसेल तर सतर्क व्हा, तुमच्या फंडची संपूर्ण मार्केटशी तुलना करा. कमी वेळासाठी त्यात घसरण असू शकेल दीर्घकालीन विचार करा आणि निर्णय घेतला पाहिजे.
4/7

एसआयपी बंद करण्यापूर्वी तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम होईल याचा देखील विचार करा, त्यामुळं एखाद्या सेक्टरमधील तुमची गुंतवणूक वाढू शकते, त्यामुळं जोखीम वाढेल. त्यामुळं पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवा.
5/7

कधी कधी एसआयपी च्या फंडमध्ये गुंतवणूक करताय त्यात शेअर बाजारातील घडामोडींमुळं घसरण होत असते. आंतरराष्ट्रीय टॅरिफ, युद्ध काळात गुंतवणूकदार जोखमीऐवजी सुरक्षित पर्ययात गुंतवणूक करतात.
6/7

जर तुम्हाला पैशांची चणचण असेल तर एसआयपी पूर्णपणे बंद करण्याऐवजी ती काही महिने स्थगित ठेवून पुन्हा सुरु करु शकता. जेव्हा आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा पुन्हा एसआयपी सुरु करु शकता. एसआयपीतून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
7/7

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 17 May 2025 11:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
