एक्स्प्लोर
Vastu Tips : तुटलेली काच अशुभ का मानतात? काच तुटण्यामागचा संकेत नेमका काय? वास्तूशास्त्रानुसार...
Vastu Tips : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, घरात काच तुटणं फार अशुभ मानलं जातं.

Vastu Tips
1/8

काच तुटण्याचा संबंध म्हणजे नकारात्मक ऊर्जा, दुर्भाग्य यांच्याशी जोडण्यात येतो. पण, वास्तूशास्त्रानुसार, काच तुटण्याचा संकेत नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
2/8

वास्तूशास्त्रानुसार, तुटलेली काच घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. यामुळे मानसिक तणाव, अशांती आणि कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते.
3/8

काचेला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानण्यात आलं आहे. तुटलेली काच घरात ठेवणं म्हणजे देवीचा अपमान करण्यासारखं आहे. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची सतत भीती राहते.
4/8

तुटलेली काच दिसायला देखील अव्यवस्थित असते. याचा प्रभाव आपल्या मनावर देखील पडतो. यामुळे राग, चिंता आणि चिडचिड वाढते.
5/8

वास्तूशास्त्रात असं मानतात की, तुटलेली काच घरातील सदस्यांमध्ये वाद निर्माण करते.
6/8

तुटलेली काच घरात शुभ कार्य आणि सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत नाही. यामुळे आपल्या कार्यात अनेक अडथळे येतात.
7/8

जर घरात लावलेला आरसा तुटला असेल तर तो अशुभ संकेत मानला जातो. यामुळे घरात दुर्भाग्य, आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 May 2025 09:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धुळे
भारत
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
