एक्स्प्लोर

झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार सरकारवर भडकले; वनमंत्र्यांचं स्पष्टीकरण

झाड तोडल्यास 50 हजार रुपयांच्या दंडासंदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यात आल्यासंदर्भातील चर्चेत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना घरचा आहेर दिला.

मुंबई : राज्यातील महायुती सरकारने वृक्षतोडीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला होता. झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता, तेव्हा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) हे होते. विना परवानगी जंगल (forest) तोडणाऱ्यांसाठी वन विभागाने हे मोठं पाऊल उचललं होतं. कारण, यापूर्वी झाडं तोडणाऱ्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणि वनमंत्री गणेश नाईक (Ganesh naik) यांच्या सूचनेवरुन हा निर्णय मागे घेतला गेला. त्यावरुन, पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईक यांच्यातील खडाजंगी पाहायला मिळाली. 

झाड तोडल्यास 50 हजार रुपयांच्या दंडासंदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यात आल्यासंदर्भातील चर्चेत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना घरचा आहेर दिला. वनमंत्री हे विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत, हे मला माहीत नाही. ⁠जगात ग्लोबल वार्मिगचा प्रश्न आहे, प्रत्येक गावामध्ये झाड तोडण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे. सध्याच्या निर्णयानुसार ⁠झाड तोडता येत नाही असं नाही, फक्त परवानगी घ्यावी लागते. पण, ⁠मंत्री महोदय हे विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला. झाड तोडल्यास दंडाची रक्कम ⁠जर 50 हजाराहून 1 लाख करायची असेल तर मी तात्काळ माघार घेईल. मात्र, हा दंड कमी करायचा असेल तर मी कदापि मागे घेणार नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध केला होता. विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हे विधेयक मागे घेण्यासाठी सरकारला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु सत्ताधारी पक्षात असूनही सुधीर मुनगंटीवार यांनी थेट विरोध केला. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला. 

नवीन बदलासह कायदा आणू - वनमंत्री

विधेयकासंदर्भातील चर्चेत बोलताना गणेश नाईक म्हणाले की, या विधेयकात झाडांची फांदी तोडणेही झाड तोडल्यासारखे आहे. झाडे तोडले तर 50 हजार रुपयांचा दंड आहे. शेतकऱ्यांने अजाणतेपणे झाड तोडले तरी 50 हजार रुपयांचा दंड होता. कुणाला तरी फायदेशीर ठरण्यासाठी हे विधेयक मागे घेतले जात नाही, असे नाईक यांनी म्हटले. तसेच, सुधीरभाऊंच्या हेतूविषयी शंका नाही. पण, तात्पुरता हा कायदा मागे घेतोय. नवीन बदलासह कायदा आणू अशी माहितीही वनमंत्री नाईक यांनी यावेळी सभागृहातील चर्चेत उत्तरादाखल दिली. 

हेही वाचा

मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेसोबत वाल्मिक कराड; जुन्या सहकाऱ्यानेच समोर आणला फोटो

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळं फासू; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, डेव्हिड घुमारेंचा इशारा
पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळं फासू; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, डेव्हिड घुमारेंचा इशारा
Kolhapur News: शिवसेना नेत्यांच्या पोस्टरवर मालोजीराजे छत्रपती झळकल्याने चर्चा रंगली; भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा
शिवसेना नेत्यांच्या पोस्टरवर मालोजीराजे छत्रपती झळकल्याने चर्चा रंगली; भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा
झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार सरकारवर भडकले; वनमंत्र्यांचं स्पष्टीकरण
झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार सरकारवर भडकले; वनमंत्र्यांचं स्पष्टीकरण
Ashadhi Wari 2025 : दर्शन रांग गोपाळपूरमध्ये, तरीही चक्क पाच तासात भाविक विठुरायाच्या चरणी, VIP दर्शन बंद झाल्यानंतर चमत्कार 
दर्शन रांग गोपाळपूरमध्ये, तरीही चक्क पाच तासात भाविक विठुरायाच्या चरणी, VIP दर्शन बंद झाल्यानंतर चमत्कार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande : सगळे निर्णय दोन्ही बंधूंनी घ्यायचे का? मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेणार की नाही?
Dr. Apoorva Hiray | अपूर्व हिरे, प्रवीण माने भाजपमध्ये; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर परिणाम
Amol Mitkari on Raj Thackeray : राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत शिकवतील ही अपेक्षा,मिटकरींचा टोला
Girish Mahajan vs Bhaskar Jadhav :कोंबडीचे भाव माहीत नाही,मी कोंबडी खात नाही...महाजनांची फटकेबाजी
Sanjay Pawar Matoshree Meeting | कोल्हापूरच्या नाराज Sanjay Pawar यांची Uddhav Thackeray यांच्याशी भेट, नाराजी दूर होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळं फासू; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, डेव्हिड घुमारेंचा इशारा
पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळं फासू; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, डेव्हिड घुमारेंचा इशारा
Kolhapur News: शिवसेना नेत्यांच्या पोस्टरवर मालोजीराजे छत्रपती झळकल्याने चर्चा रंगली; भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा
शिवसेना नेत्यांच्या पोस्टरवर मालोजीराजे छत्रपती झळकल्याने चर्चा रंगली; भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा
झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार सरकारवर भडकले; वनमंत्र्यांचं स्पष्टीकरण
झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार सरकारवर भडकले; वनमंत्र्यांचं स्पष्टीकरण
Ashadhi Wari 2025 : दर्शन रांग गोपाळपूरमध्ये, तरीही चक्क पाच तासात भाविक विठुरायाच्या चरणी, VIP दर्शन बंद झाल्यानंतर चमत्कार 
दर्शन रांग गोपाळपूरमध्ये, तरीही चक्क पाच तासात भाविक विठुरायाच्या चरणी, VIP दर्शन बंद झाल्यानंतर चमत्कार 
Kolhapur Shivsena: जिल्ह्यातील ठाकरे गट कोणाचाही दावणीला बांधू देणार नाही; जुगार अड्डे चालवणारे पालकमंत्री आणि शिंदेंसोबत दिसत आहेत, अशा लेव्हलची गद्दार सेनेत भरती, रविकिरण इंगवलेंचा हल्लाबोल
जिल्ह्यातील ठाकरे गट कोणाचाही दावणीला बांधू देणार नाही; जुगार अड्डे चालवणारे पालकमंत्री आणि शिंदेंसोबत दिसत आहेत, अशा लेव्हलची गद्दार सेनेत भरती, रविकिरण इंगवलेंचा हल्लाबोल
देशात कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकने अचानक मृत्यू? ICMR आणि NCDC कडून महत्त्वपूर्ण खुलासा
देशात कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकने अचानक मृत्यू? ICMR आणि NCDC कडून महत्त्वपूर्ण खुलासा
धक्कादायक! आमदार प्रसाद लाड यांचा AI द्वारे खोटा आवाज; बीडमध्ये पत्र अन् बोगस सहीने 3 कोटी 20 लाखांचा घपळा
धक्कादायक! आमदार प्रसाद लाड यांचा AI द्वारे खोटा आवाज; बीडमध्ये पत्र अन् बोगस सहीने 3 कोटी 20 लाखांच्या निधीचा घपळा
तिबेटचं भविष्य घडवणारे पुढचे उत्तराधिकारी कोण? दलाई लामांनी स्पष्टच सांगितलं, ' चीनचा काहीही संबंध नाही'
तिबेटचं भविष्य घडवणारे पुढचे उत्तराधिकारी कोण? दलाई लामांनी स्पष्टच सांगितलं, ' चीनचा काहीही संबंध नाही '
Embed widget
OSZAR »