Kolhapur Shivsena: जिल्ह्यातील ठाकरे गट कोणाचाही दावणीला बांधू देणार नाही; जुगार अड्डे चालवणारे पालकमंत्री आणि शिंदेंसोबत दिसत आहेत, अशा लेव्हलची गद्दार सेनेत भरती, रविकिरण इंगवलेंचा हल्लाबोल
माझ्या जवळचे सगळे नातेवाईक शिंदे सेनेमध्ये आहेत. मला सुद्धा ऑफर आल्या, मानसिक त्रास झाला. मात्र, ठाकरेंना सोडून जाण्याचा विचार मी कधी केला नसल्याचे ते म्हणाले.

Kolhapur Shivsena: कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून रणकंदन सुरू आहे. शिवसेना उपनेते संजय पवार आणि शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रवि किरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर या दोघांनी दिला. हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला, तर संजय पवार यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, आज (2 जुलै) संजय पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीवर बोलावून घेण्यात आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख रवीकरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
भविष्यात गद्दार सेना शिल्लक राहणार नाही
दरम्यान, त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की जुगार अड्डा चालवणारे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत. भविष्यात गद्दार सेना शिल्लक राहणार नाही आणि कारण भाजप असताना गिळंकृत करणार आहे. पालकमंत्री साहेब तुमच्यासोबत चक्क जुगारटा चालवणारा फिरत आहे, याची चौकशी करणार का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. हर्षल सुर्वे यांच्या राजीनाम्यावरून त्यांनी सांगितले की हर्षल सुर्वे यांना शहर प्रमुख पद दिलं होतं हे पद लहान आहे का? एवढं चांगलं पद देऊन मग नाराजी का? फुटणाऱ्यांना फक्त कारण हवं असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, आम्हाला शहरात पक्षाला गतवैभव मिळवून द्यायचं आहे. यापुढे पक्षात गट तट न ठेवता पक्ष वाढवायचा असल्याचे ते म्हणाले. माझ्या जवळचे सगळे नातेवाईक शिंदे सेनेमध्ये आहेत. मला सुद्धा ऑफर आल्या, मानसिक त्रास झाला. मात्र, ठाकरेंना सोडून जाण्याचा विचार मी कधी केला नसल्याचे ते म्हणाले.
ठाकरेंचा पक्ष कोणाच्या दावणीला बांधू देणार नाही
जिल्ह्यातील ठाकरेंचा पक्ष कोणाच्या दावणीला बांधू देणार नाही. जुगार अड्डा चालवणारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि शिंदेंसोबत दिसत आहेत. अशा लेव्हलची भरती सुरू असल्याची टीका रविकिरण इंगवले यांनी केली. हे नाराजीनाट्य अजून सुद्धा संपलले नाही, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान आज वरिष्ठांशी बोलणी झाल्यानंतर ही नाराजी दूर होईल आणि आम्ही एक दिलाने एकत्र असू असा विश्वास इंगवले यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की माझ्यासाठी राजकीय संघर्ष नवीन नाही. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, उपमहापौर झालो हे सगळे सहज आणि योगायोगाने मिळालेले नाही. मला एका खून प्रकरणांमध्ये गोवण्यात आलं. मात्र, त्यातूनही निर्दोष सुटलो. शहराच्या बाहेर राहून महापालिका निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने जिंकून आलो असल्याचे रवीकरण इंगवणे सांगितले. मतदारसंघांमध्ये प्रचार न जाता निवडून येणारा मी शहरातील एकमेव असल्याचा दावा इंगवले यांनी केला. माझी जिल्हाप्रमुख झालेली निवड ही पूर्ण विचारांची झाली असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या