Ashadhi Wari 2025 : दर्शन रांग गोपाळपूरमध्ये, तरीही चक्क पाच तासात भाविक विठुरायाच्या चरणी, VIP दर्शन बंद झाल्यानंतर चमत्कार
Pandharpur VIP Darshan : यंदा व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं असून वारकरी हेच व्हीआयपी असतील अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

सोलापूर : यंदा आषाढीमध्ये व्हीआयपी दर्शन बंद (Pandharpur VIP Darshan) झाल्यानंतर मोठा चमत्कार दिसून आला. दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असतानाही फक्त 5 तासांमध्ये भाविक थेट विठुरायाच्या चरणापाशी पोहोचू लागले आहेत. या याधी याच दर्शनासाठी 15 ते 16 तास लागायचे. आता केवळ पाच तासात विठ्ठलाचे दर्शन होत असल्याने भाविकातून समाधान व्यक्त केलं जात आहे.
खरंतर ही आषाढी यंदा विक्रमी होणार अशी परिस्थिती आहे. आषाढी एकादशी सोहळ्याला अजून चार दिवसांचा अवधी असतानाच देवाच्या दर्शन रांगेत दोन लाखापेक्षा जास्त भावी उभे आहेत. इतर वेळेला दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असताना भाविकांना 15 ते 16 तास इतका वेळ दर्शनाला लागत असे. मात्र यंदा मात्र व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे भाविकांचा दर्शनाचा 15 तासाचा वेळ केवळ पाच ते सात तासांवर आला आहे.
Ashadhi Wari 2025 : भाविक समाधानी
व्हीआयपी बंदच्या दणक्याने अनेक व्हीआयपी नाराज जरी झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. यंदाच्या आषाढीमध्ये आमचे व्हीआयपी फक्त वारकरी असतील ही भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आणि स्वतःही मुखदर्शन घेत आपण केलेला नियम पाळण्यास सुरुवात केली. त्यामुळेच तथाकथित व्हीआयपी लोकांचे वांदे झाले असले तरी वारकरी भाविक मात्र खुशीत आहेत. 15 तासाचे दर्शन पाच तासात होऊ लागल्याने दर्शन रांगेवरील ताणही पूर्णपणे कमी झाला आहे.
भाविकही आता अल्पावधीमध्ये देवाच्या चरणापर्यंत पोहोचू लागत असल्याने त्यांनाही हे दर्शन सुखकर होत आहे. यंदा आषाढी एकादशी यंदा 6 जुलै 2025 रोजी आहे. त्यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत.
Pandharpur Wari Update : वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ही बातमी वाचा: