सोलापुरातील डॉ. शिरिष वळसंगकरांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड, कोर्टाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी
Shirish Valsangkar: कामावरून काढल्याने आरोपी महिलेने डॉक्टर वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Solapur:सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर (Shirish Valsangkar) आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडत स्वतःला संपवले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयात महिलेचा दाखल केले होते. त्यावेळी न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपी महिलेस 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉक्टर वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या महिलेच्या नावाचा उल्लेख करत आरोपी महिलेमुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल करत कोर्टाच्या परवानगीने रात्रीतून महिलेला अटक केली होती.
आरोपी महिला तीन दिवस कोठडीत
सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सोलापूर सत्र व दिवाणी न्यायालयाने सुनावली आहे. न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी दीपक कंखरे यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी महिला ही डॉक्टर वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिला कामावरून काढल्याने आरोपी महिलेने डॉक्टर वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याचे धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी महिलेने मृत डॉक्टरांना नेमका कसा त्रास दिला? या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहेत का? याचा तपास करायचा असल्याने महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात यावी असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आरोपी महिलेस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 23 एप्रिलपर्यंत आरोपी महिला कोठडीत असेल.
रुग्णालयातील सर्व व्यवहार हे कागदोपत्रांवरही हवे असा डॉक्टर वळसंगकरांचा आग्रह होता. रुग्णांकडून आजकाल उपचारासाठी कोणतेही नोंद करता स्वीकारली जाणारी रक्कम यासंदर्भात त्यांनी आक्षेप घेतला होता. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला वळसंगकरांनी कामावरूनही काढलं होतं. कामावरून काढल्यानंतर महिलेने डॉक्टरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
नक्की घडले काय होते?
डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन होते. मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रिया वरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश-विदेशातून सादर केले आहेत. मात्र 18 एप्रिल ला रात्री आठ वाजता एसपी ऑफ न्यूरोसायन्स येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले असता बेडरूमच्या बाथरूम मधून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. कुटुंबीयांनी बेडरूम कडे धाव घेतली त्यावेळी डॉक्टर शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयात शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले. तब्बल पाहून तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी महिलेमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
