Riteish Deshmukh Genelia D'souza Reaction on India Pakistan War: भारतीय सैन्याची पाकिस्तानच्या पेकाटात लाथ; महाराष्ट्राच्या दादा-वहिनीची खास पोस्ट, म्हणाले...
Riteish Deshmukh Genelia D'souza Reaction on India Pakistan War: सेलिब्रिटी भारतीय सैन्याचं कौतुक करत आहेत अशातच आता अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने यासंदर्भात पोस्ट केल्या आहेत.

Riteish Deshmukh Genelia D'souza Reaction on India Pakistan War: भारतानं (India Pakistan War) थेट घुसून पाकिस्तानला (Pakistan) दणका द्यायला सुरूवात केली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत (Islamabad Capital of Pakistan) धडक मारत जोरदार भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये सीमेलगतच्या भागात ब्लॅकआउट करण्यात आला. या सर्व घडामोडींदरम्यान सेलिब्रिटी भारतीय सैन्याचं कौतुक करत आहेत. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने (Genelia D'souza) यासंदर्भात पोस्ट केल्या आहेत. महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रितेश आणि जिनेलिया देशमुखनं सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय सैन्याचं कौतुक केलंय.
भारतीय सैन्यदलांनी 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव या एअर स्ट्राईकला देण्यात आलं. एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, ड्रोन हल्ले केले, गोळीबार केला. पण, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्य अलर्ट मोडवर होतं. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावले. याचसंदर्भात रितेश, जिनेलियानं भारतीय सैन्य दलासाठी पोस्ट केल्या.
जिनिलिया देशमुखची पोस्ट
जिनिलिया देशमुखनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. जिनिलिया देशमुख म्हणाली की, "आपल्या भारतीय सैन्याला त्यांच्या शौर्य, धाडस आणि धैर्यासाठी सलाम. आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो. जय हिंद!"
रितेश देशमुखची पोस्ट
"खंबीरपणे उभे राहून, आपले रक्षण करणाऱ्या आपल्या राष्ट्राच्या खऱ्या हिरोंना सलाम भारतीय सैन्य जिंदाबाद! भारत माता की जय! जय हिंद!"
दरम्यान, भारताशी वाकड्यात जाऊन, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलीय. एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना, दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरलंय. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केलाय. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलंय.
पाहा लाईव्ह टीव्ही :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सानिया मिर्झाची 24 तासात दुसरी पोस्ट, आता झेंड्याचा उल्लेख, नेमकं काय म्हणाली?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
