एक्स्प्लोर

धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव

नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता वीजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला.

नांदेड : राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून वळवाच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच, अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काही ठिकाणी नागरिकांनाही आपला जीव गमावाला लागला आहे. आता, नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एका शिक्षकाचा (Teacher) वीज अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या दुचाकीवरच वीज कोसळल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता वीजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला. मात्र, वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटाने परिसरात हादरुन गेला होता. या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीवरुन जात होते. दुर्दैवाने त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याची चर्चा परिसरात होत आहे. मात्र, तसा दावा कुठल्याही संबंधित यंत्रणेने किंवा पोलिसांनी केला नाही. दरम्यान, पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याची देखील चर्चा गावपरिसरात होत आहे. 

नांदेडमध्ये विद्यार्थ्याने संपवलं जीवन

नांदेडमधील नर्सिंग कॉलेजच्या 22 वर्षीय विद्यार्थ्यांने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटनाघडली. महाविद्यालतील दोन शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक आणि विद्यार्थ्यांनी केलाय. 22 वर्षीय पूनित वाटकर याने 12 मे रोजी नदीत उडी घेतली, आज त्याचा मृतदेह आढळला. मयत पुनीत वाटकर हा मूळचा अमरावतीचा रहिवाशी आहे. तो आणि त्याची बहीण नांदेड लोटस कॅम्पस मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिकायला होते. वेगवेगळ्या विषयातील प्रात्यक्षिक (असाइनमेंट) सादर केल्याशिवाय परिक्षा फार्म भरत नाही, असं शिक्षकांनी सांगितलं. वेळ कमी असल्याने सर्वच विद्यार्थी मानसिक तणावात होते. त्यातूनच पुनीत वाटकर याने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. तसेच, संबधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यावर धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सूरू केला आहे.

हेही वाचा

सरन्यायाधीशांची काल शपथ, आज निकाल; पहिल्याच निर्णयात नारायण राणेंना झटका, मिलीभगत पाहून खडसावलं

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; जेवणात गुंगीचं औषध टाकून महिलेवर अत्याचार
मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; जेवणात गुंगीचं औषध टाकून महिलेवर अत्याचार
Amol Palekar : अमोल पालेकर यांच्या `ऐवज:एक स्मृतिबंध ` पुस्तकाला ला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा वि. स. खांडेकर पुरस्कार जाहीर
अमोल पालेकर यांच्या `ऐवज:एक स्मृतिबंध `पुस्तकाला ला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा वि. स. खांडेकर पुरस्कार जाहीर
धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव
धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव
डोंगरात खेळणाऱ्या मुलांना दिसला ड्रोन, पोलिसांनी तत्काळ घेतली धाव; तपासातून समोर आलं कारण
डोंगरात खेळणाऱ्या मुलांना दिसला ड्रोन, पोलिसांनी तत्काळ घेतली धाव; तपासातून समोर आलं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 15 May 2025Mathura Jail Cricket : मथुरा जेलमध्ये जेल प्रिमियर लीग, रंगले क्रिकेटचे सामनेNagpur Turkey Booking Cancell: पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कीचे 60टक्के पर्यटकांकडून बुकिंग रद्दJammu Terrorists : त्राल भागात जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सैन्याची मोठी कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; जेवणात गुंगीचं औषध टाकून महिलेवर अत्याचार
मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; जेवणात गुंगीचं औषध टाकून महिलेवर अत्याचार
Amol Palekar : अमोल पालेकर यांच्या `ऐवज:एक स्मृतिबंध ` पुस्तकाला ला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा वि. स. खांडेकर पुरस्कार जाहीर
अमोल पालेकर यांच्या `ऐवज:एक स्मृतिबंध `पुस्तकाला ला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा वि. स. खांडेकर पुरस्कार जाहीर
धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव
धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव
डोंगरात खेळणाऱ्या मुलांना दिसला ड्रोन, पोलिसांनी तत्काळ घेतली धाव; तपासातून समोर आलं कारण
डोंगरात खेळणाऱ्या मुलांना दिसला ड्रोन, पोलिसांनी तत्काळ घेतली धाव; तपासातून समोर आलं कारण
Train Accident : कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, अनेक डबे रुळावरून घसरले, अमळनेर रेल्वे स्थानकाजवळील घटना, पाहा PHOTOS
कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, अनेक डबे रुळावरून घसरले, अमळनेर रेल्वे स्थानकाजवळील घटना, पाहा PHOTOS
Stock Market : निफ्टी 50 नं 25 हजारांचा टप्पा ओलांडला, सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 5 लाख कोटी कमावले
निफ्टी 50 नं 25 हजारांचा टप्पा ओलांडला, सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 5 लाख कोटी कमावले
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना जूनच्या पहिल्या आठवड्यात जमिनी द्या; अजित पवारांचे निर्देश, शेतकऱ्यांना दिलासा
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना जूनच्या पहिल्या आठवड्यात जमिनी द्या; अजित पवारांचे निर्देश, शेतकऱ्यांना दिलासा
Repo Rate : RBI सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटवण्याची शक्यता,गृहकर्जदारांना पुन्हा दिलासा मिळणार, पतधोरण समितीची लवकरच बैठक
RBI सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटवण्याची शक्यता,गृहकर्जदारांना पुन्हा दिलासा मिळणार
Embed widget
OSZAR »