ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 11 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 11 May 2025
ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, भारतीय वायुदलाची एक्स पोस्ट, कारवाईबाबत वेळोवेळी माहिती देणार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास सडेतोड उत्तर द्या, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींच्या सूचना, कमांडर्सना अधिकार बहाल
काश्मीरसाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, भारतानं भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती, पीओके परत मिळवणं हेच एकमेव लक्ष्य असल्याचं जाहीर
काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची तयारी, शस्त्रसंधीबाबत केलेल्या एक्स पोस्टची जगभर चर्चा
संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, परेशन सिंदूर आणि अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करण्याची मागणी
अमेरिका के पापा ने वॉर रूकवाया, शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला, ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारानं मध्यस्थी केली? राऊतांकडून सवाल उपस्थित
ब्रह्मोसची ताकद काय असते ते पाकिस्तानला विचारा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सूचक वक्तव्य, ऑपरेशन सिंदूरसाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र वापरल्याची चर्चा





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
