Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचंही ते म्हणाले. भारतीय सेनेच्या कारवाईत 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशी माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली.
भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगितले की, लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना अचूक लक्ष्य करण्यात आले आहे.
पाकिस्तानी अधिकारी मारले गेले
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगितले की, "22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये 26 निष्पाप लोकांची विनाकारण हत्या करण्यात आली. दहशतवादाचे गुन्हेगार आणि त्या मागच्या लोकांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे या स्पष्ट लष्करी उद्दिष्टासह ऑपरेशन सिंदूरची संकल्पना मांडण्यात आली होती. भारतीय लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूकतेने लक्ष्य करण्यात आले आहे. 7 मे रोजी सकाळी, लष्कराने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई सुरू केली. त्यामध्ये100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यामध्ये दहशतवादी युसूफ अझहरचा समावेश आहे. 6-7 मे रोजी झालेल्या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी लष्कराचे उच्च अधिकारीही मारले गेले."





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
