IPL 2025 CSK: एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणारा गोलंदाज MS धोनीच्या संघाला पाजतोय पाणी; चेन्नईने लिलावात मुंबईला मागे टाकत लावली होती बोली
IPL 2025 CSK: पंजाबच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांना धू धू धुतल्याचे पाहायला मिळाले. खलील अहमदने चार षटकात 45 धावा दिल्या.

IPL 2025 CSK: आयपीएल 2025 च्या हंगामात पंजाब किंग्सने आपला तिसरा विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्सला (Punjab Kings vs Chennai Super Kings) 18 धावांनी पराभूत केले. युवा सलामीवीर प्रियांश आर्याच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 219 धावा उभारल्यानंतर पंजाबने चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 201 धावांवर रोखले. चेन्नई सुपर किंग्सला हंगामातील चौथा पराभव पत्करावा लागला.
Heads high, hearts stronger! 💛#PBKSvCSK #WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/6qbnF3YfOg
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 9, 2025
पंजाबच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांना धू धू धुतल्याचे पाहायला मिळाले. खलील अहमदने चार षटकात 45 धावा दिल्या. तर रविचंद्रन अश्विनने 4 षटकांत 48 धावा दिल्या आणि मथिशा पाथिरानाने 4 षटकांत 52 धावा दिल्या. चेन्नईकडे वेगवान गोलंदाजीचे चांगले पर्याय आहेत. कमलेश नागरकोटी, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन यांच्याव्यतिरिक्त यॉर्कर किंग अंशुल कंबोज (Anshul Kamboj) देखील आहे, ज्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. मात्र अंशुल कंबोजला सध्या चेन्नईने प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाहीय. त्यामुळे जर चेन्नई सुपर किंग्सने अंशुल कंबोजला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले, तर तो धोनीच्या संघाला विजयी मार्गावर परत आणण्यास मदत करू शकतो.
चेन्नई सुपर किंग्सने अंशुल कंबोजला 3.4 कोटी रुपयांना केले होते खरेदी-
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 च्या लिलावात युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला 3.4 कोटी रुपयांना खरेदी केले. अनकॅप्ड अंशुल कंबोजची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम बोली लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स देखील या शर्यतीत सामील झाले. यामुळे अंशुलची किंमत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. शेवटी चेन्नईने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले. अंशुल कंबोजने गेल्याच हंगामात मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
अंशुल कंबोज कोण आहे?
अंशुल हा हरियाणाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये आठ विकेट्स घेतल्या. त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने रणजी ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली. हरियाणाकडून खेळताना त्याने केरळविरुद्ध एका डावात 10 विकेट्स घेतल्या. 24 वर्षीय अंशुलने 22 टी-20 सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
