एक्स्प्लोर
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
मुंबईतील सिमेंट काँक्रीटकरण्याच्या रस्त्याबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे प्रथमच आमने-सामने आले होते.

Aaditya Thackeray and Eknath Shinde meeting
1/7

मुंबईतील सिमेंट काँक्रीटकरण्याच्या रस्त्याबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे दोघेही प्रथमच आमने-सामने आले होते.
2/7

विधानसभेतील उपमुख्यमंत्री कार्यालयातील आपलं कामकाज झाल्यानंतर एकनाथ शिंदे उशीरा ह्या बैठकीला उपस्थित राहिले. मात्र, तत्पूर्वीच शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. अध्यक्षांनी बैठकीला सुरुवातही केली होती.
3/7

शिवसेना पक्षफुटीनंतर प्रथमच ठाकरे आणि शिंदे एका बैठकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले, यावेळी आदित्य ठाकरेंनी सुरुवातील एकनाथ शिंदेंना पाहून तोंड फिरवल्याचं दिसून आलं. मात्र, काही वेळातच त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पाहून टशन दिल्याचंही दिसून आलं.
4/7

विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंची या बैठकीसाठी एंट्री होताच सभागृहातील अनेक नेतेमंडळी उठून उभी राहिली. मात्र, आदित्य ठाकरे आपल्या खुर्चीवरच बसून राहिले होते. त्यामुळे, या बैठकीची चांगलीच चर्चा होत आहे.
5/7

मुंबईतील रस्त्यांच्या क्राॉक्रीटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी बैठकीत केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या समक्ष विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी ही मागणी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांकडेही रस्ते कामांबाबत चौकशीची मागणी करणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.
6/7

विधानसभा अध्यक्षांसमक्ष झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी रस्ते कामांच्या आढावा घेणारा रिपोर्ट सादर केला. टप्पा 1 मध्ये 23 टक्के काम झाले तर टप्पा 2 मध्ये 0.5 टक्के काम झाल्याची माहिती त्यांनी दिली.
7/7

या बैठकीत रस्त्यांच्या कामांचा दर्जा; मुदतीत काम पूर्ण होणारर का?; समन्वयातील अडथळे यांवर मुंबईतील आमदारांनी लक्ष वेधले. एकंदरीत खेळीमेळीत आणि थोडीसी तणावात ही बैठक संपन्न झाली.
Published at : 24 Mar 2025 07:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
