एक्स्प्लोर
Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सेफ पर्याय , जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
Gold price: 2024 या वर्षात सोन्याचे भाव विक्रमी 20.22 टक्क्यांनी वधारले आहेत. सध्या सोन्याचा भाव 90 हजार रुपये प्रतितोळ्याच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 10 हजारांनी वाढला

Gold latest rates
1/21

2005 साली सोन्याचा भाव 7 हजार रुपये प्रतितोळा होता
2/21

2006 साली सोन्याचा भाव 8400 रुपये प्रतितोळा झाला.
3/21

2007 साली सोन्याचा भाव 10,800 रुपये इतका झाला.
4/21

2008 साली 10 ग्रॅम सोन्यासाठी 12 हजार 500 रुपये मोजावे लागत होते.
5/21

2009 मध्ये सोन्याचा प्रतितोळा दर 14,500 रुपये इतका झाला.
6/21

2010 साली 10 ग्रॅम सोन्याचा दर थेट 18,500 रुपयांवर पोहोचला.
7/21

2011 साली सोन्याचा दराने मोठी उसळी घेतली. या वर्षात 10 ग्रॅम सोन्याचा दर 26 हजार 400 रुपये इतका होता.
8/21

2012 साली सोन्याचा प्रतितोळा दर 31,500 रुपयांवर जाऊन पोहोचला.
9/21

2013 साली सोन्याच्या दरात घसरण झाली. त्यामुळे 10 ग्रॅम सोने 29 हजार 600 रुपयांना मिळत होते.
10/21

2014 साली देशात मोदी सरकार सत्तेत आले त्यावर्षी सोन्याचा प्रतितोळा भाव 28,006.50 रुपये इतका होता.
11/21

2015 साली सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली. या वर्षात एक तोळा सोन्यासाठी 26,343 रुपये मोजावे लागत होते.
12/21

2016 साली सोन्याचा भाव वाढला. यावर्षी 10 ग्रॅम सोन्यासाठी 28,623.50 रुपये मोजावे लागत होते.
13/21

2017 साली सोन्याचा भाव 29,667.50 रुपये इतका होता
14/21

2018 मध्ये 10 ग्रॅम सोन्यासाठी 31 हजार 438 रुपये मोजावे लागत होते
15/21

2019 साली देशात दुसऱ्यांदा मोदी सरकार आले त्यावर्षी सोन्याचा भाव 35,220 रुपये इतका होता.
16/21

2020 साली सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली. यावर्षी सोन्याचा प्रतितोळा दर थेट 48,651 रुपयांवर जाऊन पोहोचला.
17/21

2021 साली सोन्याचा प्रतितोळा दर 48,720 रुपये इतका होता. दर
18/21

2022 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,670 रुपये इतकी होती.
19/21

2023 साली सोन्याचा प्रतितोळा दर मोठी उसळी घेऊन 65, 330 रुपयांवर जाऊन पोहोचला.
20/21

2024 साली सोन्याचा दर 77,913 रुपये प्रतितोळा इतका झाला.
21/21

2025 हे वर्ष उजाडल्यानंतर जानेवारी महिन्यात सोन्याचा प्रतितोळा भाव 10 हजारांनी वधारला आहे. 21 फेब्रुवारीला सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक पातळी गाठली. आता 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90 हजार रुपये इतकी झाली आहे. जीएसटीची रक्कम धरुन एक तोळा सोन्याची किंमत 92 हजारांच्या घरात पोहोचली आहे.
Published at : 21 Feb 2025 03:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
शेत-शिवार
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
