Sanjay Raut On Eknath Shinde: ईडीकडून अटक होण्याआधी संजय राऊतांना एकनाथ शिंदेचा फोन; म्हणाले, मी अमित शाह यांच्यासोबत...
Sanjay Raut On Eknath Shinde: संजय राऊतांचं आज नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या पुस्तकात देखील संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

Sanjay Raut On Eknath Shinde मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधत एक खळबळजनक विधान केलं आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मला फोन आला होता. मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असं एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले. यावर काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले, असा गौप्यस्फोट स्वत: संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला. संजय राऊतांचं आज नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या पुस्तकात देखील संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं?
ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता, असा दावा संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंनी मला फोन करुन मी वरती बोलू का?, अमित शाह यांना सांगू का? असं विचारले. यावर नको, काही गरज नाही, असं मी म्हणालो, असं संजय राऊत म्हणाले. तसेच तुम्ही वरती बोलल्यानंतरही मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले.
अटकेआधी मी अमित शाह यांना फोन केलेला- संजय राऊत
माझ्या अटकेआधी मी शहा यांना फोन केला होता, कारण ते गृहमंत्री होते. रात्री 11 वाजता अमित शाह यांना कॉल केला होता ते कामात होते. 4-5 मिनिटांनी त्यांचा कॉल आला. अटकेआधी माझ्या निकटवर्तीयांना त्रास दिला जात होता , धमक्या दिल्या. मी म्हणालो माझ्या मित्रावर रेड पडत आहे.. हे तुमच्या मंजुरीने होतं आहे. जर मला अटक करायची आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे ही नौटंकी बंद करा, असं मी अमित शाह यांना म्हणालो. यावर मला काहीच माहिती नाही, असं अमित शाह म्हणाले. माझ्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?, असा सवाल संजय राऊतांनी अमित शाह यांना केल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
अमित शाहांमुळे शिवसेना अन् भाजपमध्ये कटुता- संजय राऊत
अमित शाह यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली हे मी 100 टक्के सांगतो. आमचे भाजपचे संबंध चांगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत चांगले संबंध होते. पण अमित शाह दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेना नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. काही भाजप नेत्यांनी अमित शाह यांना सांगितलंसुद्धा तुम्ही असं करू नका...अरुण जेटली अमित शाह यांना म्हणाले होते, की महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चांगले संबंध आहेत, तुम्ही असं करु नका, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.
संजय राऊतांची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
