'ऑपरेशन सिंदूर'ने नांगी ठेचून काही दिवस सुद्धा होत नाहीत तोपर्यत पाकिस्तानने पुन्हा फणा काढला; 'आयएसआय'चा कट रचण्यासाठी नवीन पॅटर्न
Pakistan : भारताचा पाकिस्तानशी असलेला तणाव काहीसा कमी झाला असला, तरी परंतु पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) अजूनही भारतात अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर काम करत आहे.

Inter-Services Intelligence : पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पंधरा दिवसात पाकिस्तानची नांगी ठेचताना ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) करत दहशतवाद्यांचे तळ हवेतून उद्ध्वस्त करून टाकले. हवाई तळांना सुद्धा दणका देत अचूक लष्करी सामर्थ्याची ताकद दाखवून दिली. यानंतर भारताचा पाकिस्तानशी असलेला तणाव काहीसा कमी झाला असला, तरी परंतु पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (Inter-Services Intelligence) अजूनही भारतात अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर काम करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर आयएसआयनेआता खलिस्तानी समर्थकांना (Khalistani supporters) भडकवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून भारतात मोठी दहशतवादी घटना घडू शकेल.
खलिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचे काम
आयएसआय खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस (एसएफजे) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू आणि कॅनडामधील इतर खलिस्तानी दहशतवाद्यांची मदत घेत आहे. त्यांच्या माध्यमातून पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचे काम सुरू झाले आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतातील पोलिस स्टेशन, सैन्य आणि सरकारी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा आहे. कट रचण्यासाठी गेल्या काही दिवसांत एक नवीन पॅटर्न दिसून आला आहे. फरार खलिस्तानी दहशतवादी आता पुन्हा भारतात येऊ लागले आहेत, जेणेकरून येथे मोठी दहशतवादी घटना घडू शकेल. गुप्तचर संस्थांनी देशातील सर्व सुरक्षा तपास संस्थांना याबद्दल इशारा दिला आहे. यानंतर एनआयए, पंजाब-दिल्ली-चंदीगड पोलिस आणि इतर राज्यांचे पोलिस अलर्ट मोडवर आहेत. काही राज्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
4 प्रकरणांमध्ये खलिस्तानी नेटवर्क पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येते
- नाभा तुरुंग फोडण्याचा आरोपी आणि 10 लाख रुपयांचे बक्षीस असलेला दहशतवादी काश्मीर सिंग 9 वर्षांनी भारतात परतला आणि त्याला बिहारमधून अटक करण्यात आली.
- चंदीगडवर हल्ला करू इच्छिणारा बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी हॅरी याला मणिमाजरा येथून पिस्तूलसह पकडण्यात आले.
- गेल्या आठवड्यात, चंदीगड पोलिसांनी बीकेआयच्या 2 सक्रिय खलिस्तानी दहशतवादी जोबनजीत सिंग आणि सुमनदीप सिंग यांना आरडीएक्ससह अटक केली. अमृतसर पोलिस स्टेशनवरील बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणात ते हवे होते.
- बब्बर खालसाशी संबंधित 5 दहशतवादी ग्रेनेडने अमृतसर पोलिस स्टेशनवर हल्ला करण्यासाठी आले होते, परंतु त्यांना अटक करण्यात आली.
खलिस्तान समर्थित सोशल मीडिया पेज पाकिस्तानमधून
गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधून चालवले जाणारे खलिस्तान समर्थित सोशल मीडिया अकाउंट रोखले आहे. ही सर्व बॉट ऑपरेटेड अकाउंट आहेत आणि त्यांनी स्वतःला भारतीय असल्याचे दाखवले आहे. ही सोशल मीडिया अकाउंट्स काही शीख व्यक्तीची ओळख किंवा बनावट नाव वापरून तयार करण्यात आली आहेत. केंद्राने खलिस्तान समर्थकांना भडकावणारे 100 व्हिडिओ ब्लॉक केले आहेत. दहशतवादी पन्नूचे 50हून अधिक बॉट सोशल मीडिया अकाउंट्स देखील बंद करण्यात आले आहेत.
10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी
10 मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली. तथापि, पाकिस्तानने सलग दोन वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले. 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये पुन्हा चर्चा झाली. ज्यामध्ये सीमेवरून सैनिक कमी करण्याचे आणि एकमेकांविरुद्ध कारवाई थांबवण्याचे मान्य करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
