Giorgia Meloni Video : मुसळधार पावसात रेड कार्पेटवर थेट गुडघ्यावर बसून पंतप्रधानांकडून इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनींचं ग्रँड वेलकम अन् गळाभेट!
Giorgia Meloni Grand Welcome Video : युरोपियन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ग्रँड वेलकमचा जगभरात चर्चेचा विषय झाला आहे.

Giorgia Meloni Grand Welcome Video : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी अल्बेनियाची राजधानी तिरानामध्ये आयोजित यूरोपियन पॉलिटिकल कम्यूनिटी समिटमध्ये सहभागी होण्यासाठी अल्बेनियाच्या दौऱ्यावर पोहोचल्या. युरोपियन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ग्रँड वेलकमचा जगभरात चर्चेचा विषय झाला असून अल्बानियांच्या पंतप्रधानांनी थेट गुडघ्यावर बसून त्यांचे स्वागत केले. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही त्यांनी केलेल्या स्वागताने मेलोनी भारावून गेल्या. त्यामुळे या भेटीचा व्हिडिओ जगभरात अवघ्या काही क्षणात व्हायरल झाला. मेलोनी यांची लोकप्रियता भारतामध्ये सुद्धा असून त्या भारत भेटीवर आल्यानंतर त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.
रेड कार्पेटवर एका गुडघ्यावर बसून आणि दोन्ही हात जोडून स्वागत
इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनी युरोपियन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आल्या तेव्हा अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी रेड कार्पेटवर गुडघ्यावर बसून आणि दोन्ही हात जोडून त्यांचे स्वागत केले. अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी जॉर्जिया मेलोनी यांचे स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. सोशल मीडिया युझर्सकडून पंतप्रधान एडी रामा यांच्या आदरातिथ्याचे कौतुक केले.
Giorgia Meloni truly commands the utmost respect of world leaders. This is quite the sight to see. pic.twitter.com/xBp3d0Qi7j
— Joey Mannarino 🇺🇸 (@JoeyMannarinoUS) May 16, 2025
लोकांनी जॉर्जिया मेलोनीचे कौतुक केले
सोशल मीडियावर लोक इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचेही कौतुक करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका युझर्सने म्हटले की, "जॉर्जिया मेलोनीला जागतिक नेत्यांकडून इतका आदर मिळणे हे जागतिक स्तरावर त्यांचा वाढता प्रभाव दर्शवत आहे. एखाद्या नेत्याचा अशा प्रकारे आदर केला जाणे हे खूप प्रभावी आहे." अन्य एकाने म्हटले आहे की, "इटली खूप भाग्यवान आहे की असा नेता आहे ज्यांचा जागतिक नेत्यांकडून अशा प्रकारे आदर केला जातो. तर युरोपातील इतर देशांमध्ये, आदर मिळवण्यासाठी सत्तेचा वापर केला जातो."
यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने स्वागत
तथापि, अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे गुडघे टेकून स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. युरोपियन शिखर परिषदेपूर्वी, या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला अबू धाबी येथे झालेल्या जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेदरम्यान, अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे 48व्या वाढदिवसानिमित्त गुडघ्यावर बसून स्वागत केले आणि त्यांना स्कार्फ देखील भेट दिला. या दरम्यान, पीएम रामा यांनी मेलोनी यांचे तंती ऑगुरी (वाढदिवसाच्या शुभेच्छा) हे गाणे गाऊन अभिनंदन केले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
