Anjali Damania on Ajit Pawar : अजितदादा म्हणाले, केवळ लग्नाला गेलो म्हणून माझ्या मागे लचांड लागलं, आता अंजली दमानियांकडून खरपूस समाचार; म्हणाल्या, त्यांनी...
Anjali Damania on Ajit Pawar : त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. माझा त्यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. मी फक्त लग्नाला हजर होतो, एवढाच माझा त्यांच्याशी संबंध असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.

Anjali Damania on Ajit Pawar : वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane) या दोघांना पोलिसांनी सात दिवसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील वैष्णवीच्या लग्नाला हजर राहिले होते. अलीकडेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अजित पवार यांनी भाष्य केलं होतं. कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का? उगाच बदनामी करताय. माझी चूक असेल तर फासावर लटकवा. माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. माझा त्यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. मी फक्त त्या लग्नाला हजर होतो, एवढाच माझा त्यांच्याशी संबंध. लग्नाला गेल्यामुळे उगाच माझ्यामागे असं लचांड लागतं, असे त्यांनी म्हटले होते. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या अटकेवर देखील त्यांनी भाष्य केले आहे.
अंजली दमानिया म्हणाले की, हगवणे कुटुंबियांना अधिकाधिक शिक्षा व्हायला हवी, सात दिवसानंतर आरोपींना अटक होते. सहा दिवस वैशालीचं बाळ नेमकं होतं कुठे? ज्या व्यक्तीकडून ते बाळ ताब्यात घेतलं गेलं त्याची पार्श्वभूमी तर भयानक आहे. राजकीय वरदहस्ताशिवाय या गोष्टी घडत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मुलाचे मामा सूपेकर यांनीही मदत केल्याचा संशय
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, अजितदादांनी त्या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी केली. हे ऐकून आनंद झाला. मात्र, संध्याकाळी दादा लग्नात लचांड मागे लागलं, असे बोलले, पण यातून त्यांचं गांभीर्य दिसत नाही. महिला बाल विकासमंत्री कुठे आहेत? मंत्रीपद हे फक्त मिरवायला नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. त्या मुलाचे मामा सूपेकर यांनीही मदत केल्याचा संशय आहे. त्याचे पुरावे मी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहेत. त्याचीही चौकशी व्हायला हवी. पुण्यातील प्रत्येक एका घटनेमागे एकच पक्षाचं नेतृत्व प्रामुख्याने दिसून आलंय, आपण पक्षात कोणाला घेतोय? याचं भान ठेवायला हवं, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी आता आत्मपरीक्षण करावं
आताच्या घटकेला राजकीय दबाव परत परत येतं आहे. एका राजकीय पक्षाचा तो पदाधिकारी होता. अजित पवार एका सभेत या घटनेचा हास्यविनोद करतात. ही काय भाषा आहे त्यांची? पक्षाचे असताना हकालपट्टी करा. विरोधी पक्षाचे नेते तिथे पोहोचले. रुपाली ठोंबरे व्यवस्थित वैष्णवीच्या कुटुंबासोबत लढल्या. अजित पवार यांनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पोरशे अपघातात देखील त्यांच्या आमदाराचा हात होता. मयुरी जगतापला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. पोलिसांनी एफआयआय महिलेच्या घरी दाखल करावं, हे महिला आयोगाचं काम आहे. जी रिक्त पदं आहेत ती आधी भरून काढली पाहिजे. हा कुठलाही पदाधिकारी नाही, असं सांगितलं होतं. काहीच संबंध नाही, असं सांगण्यात आलं होतं. तो नुसता कार्यकर्ता नव्हता, तर त्याने लोकसभा निवडणूक लढवली होती. या गोष्टी का लपवल्या गेल्या? अजित पवारांनी लग्नात जी चावी दिली, तेव्हा त्यांनी विचारलं की चावी दिली की घेतली? तेव्हा त्यांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती. तुम्ही चुकत आहात याची जाण आली पाहिजे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
अदिती तटकरे फक्त पालकमंत्रीपदासाठी लढताय
अजित तटकरे यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली. याबाबत विचारले असता अंजली दमानिया म्हणाल्या की, अदिती तटकरे यांचा रोल राजकारणात काय आहे? त्या फक्त पालकमंत्रीपदासाठी लढत आहेत. महिला विकास खातं नेमकं काय करत आहे? असा हल्लाबोल त्यांनी केला. तर अजित पवारांनी बोलताना भान बाळगावं असंही अंजली दमानिया म्हणाल्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
