500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असणारे वैष्णवीचे मामासासरे, IG सुपेकरांचा दबाव; अंजली दमानियांचा दावा
जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत.

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavai hagawane) प्रकरणाता पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून सासरे राजेंद्र हगवणे आणि थोरला दीर अद्याप फरार आहेत. याप्रकरणी, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. कारण, राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यामुळेच, पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damaniya) यांनी याप्रकरणी एका आयजी अधिकाऱ्याकडे अंगुलीनिर्देश केले आहेत. वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे IG म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत, त्यांच्या मी माहिती घेतली असून या मांमांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. जालिंदर सुपेकर या शशांकच्या IG मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे, एवढच नाहीतर जळगाव मध्ये PSI सादरे जे होते त्यांना, या IG नेच त्रास दिल्याचे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं, अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.
जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. मयुरी जगताप जी हगवणेंची मोठी सून आहे, तिने पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरवेळी देखील हगवणे कुटुंब फरार होते. तेव्हा, वैष्णवीच्या नणंदेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. म्हणजेच, फरार व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि मयुरीच्या आई आणि भावा विरुद्ध FIR करते, आणि पुन्हा गायब होते. तसेच, तू आमचं काहीही बिघडू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देते, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. मला असं वाटतं की, हे कुटुंब अतिशय विकृत मानसिकताचं आहे, यामध्ये सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही दमानिया यांनी केली.
हगवणे कुटुंबीय माझे दूरचे नातेवाईक - सुपेकर
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. त्यासोबतच गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झाला नाही. मलाही दोन मुली असून, अशा गंभीर अन निर्घृण कृत्याचे समर्थन कोणताही बाप करूच शकत नाही. आरोपींना त्यांच्या कृत्याची सजा व्हायलाच हवी, ही माझी स्पष्ट भूमिका आहे, असे पोलीस महानिरीक्षाक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
फोटो पाहून घातपात असल्याची शंका - दमानिया
वैष्णवीचे सगळ्यात ज्यास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिश्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सूनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली होती. सुनांनाच नाही तर सुशीलला देखील छळलं जायचं.ह्या कुटुंबाला खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा खालचा फोटो खूप संशयास्पद वाटतोय. हे काहीतरी वेगळे आहे, असे ट्विटही दमानिया यांनी केलं आहे. कारण, वैष्णवीच्य अंगवरील जखमांपैकी तीन छिद्र असलेली जखम संशयास्पद वाटते. वैष्णवीच्या वडिलांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्याचेही दमानिया यांनी म्हटलं आहे.
वैष्णवीच्या नवऱ्याचे (शशांक हगवणे) ह्यांचे मामा IG जालिंदर सुपेकर ह्यांच्यावर देखील ५०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी जानेवारी २०२५ पासून चालू आहे. pic.twitter.com/iFt0G7MIN9
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 22, 2025
हेही वाचा
Video अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; म्हणाले, तर मी लग्न लग्नच होऊ दिलं नसतं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
