एक्स्प्लोर

Video संघर्षाचा काळ आठवला, सरन्यायाधीश भूषण गवई गहिवरले; आईंनाही अश्रू अनावर, पदराने डोळे पुसले

आपल्या या प्रेमाच्या वर्षावाने पूर्ण पणे ओतंबून गेलेलो आहे, गेल्या 40 वर्षांपासून आपले आशिर्वाद आणि साथ लाभलेली आहे. जीवनांच्या अंतापर्यंत हे विसरणार नाही.

मुंबई : देशाचे 52 वे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्रपुत्र भूषण गवई (Bhushan gavai) यांचा आज मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातून भूषण गवई यांनी आपला प्रवास उलगडताना भूतकाळातील संघर्षमय काळ सांगितला. सरन्यायाधीशांनी (CJI) अमरावतीपासून सुरू झालेला प्रवास, नागपूर आणि मुंबई-दिल्लीतील अनेक घडामोडी सांगितल्या. वडिलांकडून चळवळीतील काम अनुभवता आल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न जवळून पाहिल्याचंही त्यांनी म्हटलं. वडिलांनी चळवळीला वाहून घेतल्याने आईने खंबीरपणे घरातील सर्वच भावंडांची जबाबदारी पार पडल्याचं सांगताना ते गहिवरलेय.त्यावेळी, भूषण गवईंना अश्रू अनावर (Emotional) झाले होते, तर त्यांच्या आईनेही पदराने आपले डोळे पुसत आनंदाश्रूंना वाट मोकळी केल्याचं पाहायला मिळालं. सभागृहातील हे वातावरण पाहून सारेच काही क्षणासाठी भावूक झाल्याचं दिसून आलं. 

आपल्या या प्रेमाच्या वर्षावाने पूर्ण पणे ओतंबून गेलेलो आहे, गेल्या 40 वर्षांपासून आपले आशिर्वाद आणि साथ लाभलेली आहे. जीवनांच्या अंतापर्यंत हे विसरणार नाही. माझ्या प्रवासाची सुरूवात अमरावतीतून झाली, नगरपरिषदेच्या शाळेतून माझी सुरूवात झाली. आई वडिलांचे संस्कार माझ्यावर आले. त्यामुळे आज मी जो कोणी आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आई वडिलांमुळेच, असल्याचे गवई यांनी यावेळी म्हटले. त्यावेळी परिस्थिती बेताची होती. वडिलानी स्वत:ला चळवळीत झोकून दिलं होतं, आईवर सर्व जबाबदारी आली होती. माझे सर्व कुटुंबीय भाऊ-बहिण आम्ही एकत्रचं होतो. लहानपणापासून आईकडून खूप शिकलो, असे सांगताना सरन्यायाधीश गहिवरल्याचं पाहायला मिळालं. तर, त्याचवेळी व्यासपीठावर असलेल्या त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांना देखील अश्रू अनावर झाले. त्यावेळी, आपल्या पदाराने त्यांनी डोळे पुसले. सभागृहाती हा क्षण सर्वांनाच भावूक करुन केला. 

पुढे बोलतान गवई म्हणाले की, वडिल जिथे जिथे कार्यक्रमाला जायचे तिथे मी जायचो, समाजाचे तळागाळातील लोकांचे प्रश्न काय असतात मी समजून घेतले. भारतीय राज्यघटना त्यांना ज्ञात होती, माझ्या वाटचालीत राज्य घटनेचा खूप मोठा हात आहे. मला वकिल बनायचं नव्हतं मला आर्किटेक्चर व्हायचं होतं, माझ्या वडिलांची इच्छा होती त्यांना वकिल व्हायचं होतं. मात्र, त्याना होता न आल्याने मी वकिल बनून त्यांची इच्छा पूर्ण केली, असा किस्साही गवई यांनी सांगितला. सन 1985 सालीये मी राजाभाऊ भोसलेंसोबत वकिली चालू केली, राजाभाऊंकडून बरंच शिकायला मिळालं. राजाभाऊंनी आम्हाला मोकळीक दिली होती, वरिष्ठ वकिलांचे युक्तीवाद ऐकता आले. माझा पुढाकाराने उच्च न्यायालायाच्या बार असोसिएशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावता आला. सुप्रीम कोर्टातही चंद्रचूड यांच्या परवानगीने आम्ही पुतळा उभा केला, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे गवई यांनी म्हटले. 

दादासाहेबांचा सल्ला एकूण मी 1990 साली नागपूरला गेलो, तिथेही मला चांगलं शिकायला मिळालं. तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले होते. माझी इच्छा होती मुख्य न्यायाधिश व्हायची, मी ती कधीही लपवून ठेवली नाही. माझज नावही त्यासाठी गेलं होतं, पण नेहमीप्रमाणे  एक दीड वर्ष लटकलं, ती वेगळीच स्टोरी आहे. माझ्या दोन मित्रांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतं आहे. सन 2019 मधील घटना सांगितली नाही तर सर्व अर्धवट राहिल. सर्वोच्च न्यायालयात शेड्युल कास्टचं पद रिक्त होतं, ओक यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टात मुंबईचे तीन न्यायाधीश आहेत. मुंबईचा कोटा फूल आहे, तुम्ही दुसऱ्या मार्गाने जा. मी ते ऐकलं. नागपूरच्या एका जज यांनी सर्व झोपडपट्या पाडण्याचे आदेश दिले होते. मी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, मला आनंद आहे, त्या लाखो लोकांच्या घरावरील छत मला वाचवता आलं. 

फंडामेंटल राईट्सला संसदही हात लावू शकत नाही

गुन्हेगार जरी असला तरी त्यांच्या कुटुंबीयांवरचं छत हे काढून घेता कामा नये, तो त्याचा मुलभूत अधिकारआहे. फंडामेंटल राईट्सचा मूळ गाभा आहे, त्याला पार्लिमेंट हात लावू शकत नाही, अशा शब्दात भूषण गवई यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबईतील सत्कार स्वीकारल्यानंतर दादर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

हेही वाचा

तयारीला लागा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याच्या सूचना; अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना उभारी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Herald Case: नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
International Tea Day : निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? 
निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? 
केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र
केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र
एक नंबर मुहूर्त, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची तारीख ठरली; 6 भाषेत होणार प्रदर्शित
एक नंबर मुहूर्त, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची तारीख ठरली; 6 भाषेत होणार प्रदर्शित
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jyoti Malhotra Case | पाकिस्तानात लग्न करून द्या, ISI एजंट अली हसन कडे ज्योतीनं केलेली मागणीSupriya Sule : तिच्या अंगावर मारहाणीचे वळ होते, Vaishnavi Hagavane बाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Pune Rains Flooded City : पुण्याने चक्क मुंबईला मागे टाकलं...पहिल्याच पावसात सगळं शहर तुंबलं!Maharashtra Superfast News | 3 PM | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा | 21 May 2025

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Herald Case: नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
International Tea Day : निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? 
निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? 
केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र
केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र
एक नंबर मुहूर्त, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची तारीख ठरली; 6 भाषेत होणार प्रदर्शित
एक नंबर मुहूर्त, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची तारीख ठरली; 6 भाषेत होणार प्रदर्शित
वैष्णवीच्या वडिलांनी अजित दादांच्याहस्ते दिलेली चावी; फॉर्च्युनर अन् ॲक्टिव्हा पोलिसांकडून जप्त
वैष्णवीच्या वडिलांनी अजित दादांच्याहस्ते दिलेली चावी; फॉर्च्युनर अन् ॲक्टिव्हा पोलिसांकडून जप्त
Ganesh Utsav 2025 Konkan: चाकरमन्यांसाठी आनंदाची बातमी! गणपतीला कोकणात समुद्रमार्गे जाता येणार, साडेचार तासांत मालवण, तीन तासांत रत्नागिरीला पोहोचणार
चाकरमन्यांसाठी आनंदाची बातमी! गणपतीला कोकणात समुद्रमार्गे जाता येणार, साडेचार तासांत मालवण, तीन तासांत रत्नागिरीला पोहोचणार
Pune crime news Vaishnavi Hagawane: सुषमा अंधारेंकडून वैष्णवी हगवणेचं डेथ सर्टिफिकेट शेअर; ससून रुग्णालयाने नेमकं काय म्हटलं? अंगावर जखमा अन् मान....
सुषमा अंधारेंकडून वैष्णवी हगवणेचं डेथ सर्टिफिकेट शेअर; ससून रुग्णालयाने नेमकं काय म्हटलं? अंगावर जखमा अन् मान....
पहिल्यांदा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जाऊन अपील करा मग आमच्याकडे या; 'नोटकांड' न्यायमूर्ती यशवंत वर्मांविरुद्ध एफआयआर मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पहिल्यांदा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जाऊन अपील करा मग आमच्याकडे या; 'नोटकांड' न्यायमूर्ती यशवंत वर्मांविरुद्ध एफआयआर मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Embed widget
OSZAR »