Akola News: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेचा अपघात; ॲम्बुलन्स थार गाडीला जाऊन धडकली
Akola News: उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकोला येथील शिवनी विमानतळाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना ताफ्याच्या पाठीमागे असलेल्या ॲम्बुलन्सचा अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे.

Akola News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज अकोला (Akola) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार आज साडे नऊ वाजता अकोल्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांचे शिवणी विमानतळावर स्वागत करण्यात आले. अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठकीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अजित पवार अकोला अकोल्यात आले आहे.
अशातच, अकोला शिवनी विमानतळाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना ताफ्याच्या पाठीमागे असलेल्या ॲम्बुलन्सचा अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या ताफ्याच्या पाठीमागे असलेल्या ॲम्बुलन्स वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोला विमानतळावरुन राष्ट्रीय महार्गावर येत असताना या ताफ्यातील ॲम्बुलन्सचा अपघात झालाय. तर अजित पवारांच्या ताफ्यातील थार गाडीला धडक लागल्यामूळ अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलेही जीवितहानी झाली नाहीये.
काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगडसह इतर पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, नुकताच अजित पवारांचा ताफा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे. या बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरीसह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आमदार बैठकीसाठी उपस्थित आहेत. अजित पवार थोड्याच वेळात अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या घरी जाऊन देखील ते भेट घेणार आहेत. त्यानंतर कार्यकर्ता संवाद मेळाव्याला अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी महापौर मदन भरगड आज राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश करणार आहेत. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगडसह इतर पदाधिकाऱ्यांचा देखील राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना नवा कानमंत्र?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत या सोबतच अजित पवार हे खामगाव येथे बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा सुद्धा घेत आहे. अजित पवारांच्या या मेळाव्याला राज्याचे राष्ट्रवादीचे अनेक मंत्री व नेतेही उपस्थित राहणार आहेत आजच्या मेळाव्यात अजित पवार हे आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं असेल
इतर महत्वाच्या बातम्या