Zapuk Zupuk Box Office Collection: सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' दणकून आपटला, पण 'आता थांबायचं नाय', 'गुलकंद'ला प्रेक्षकांची साथ; बॉक्स ऑफिसवर किती कमाई?
Suraj Chavan Zapuk Zupuk Box Office Collection: एकापाठोपाठ एक बहुचर्चित मराठी सिनेमेप्रदर्शित झाले आहेत. पण, सर्वात चर्चा होती सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाची.

Suraj Chavan Zapuk Zupuk Box Office Collection: चित्रपट हिट झाला की, फ्लॉप याचं गणित त्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर (Box Office Collection) अवलंबून असतं. सध्या एकापाठोपाठ एक बहुचर्चित मराठी सिनेमेप्रदर्शित झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी मनोरंजनाची मराठमोळी मेजवाणी मिळाल्यामुळे सिनेरसिकांनीही चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली आहे. सरत्या आठवड्यात भरत जाधव (Bharat Jadhav), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांचा 'आता थांबायचं नाय' आणि समीर चौघुले, सई ताम्हणकर (Sai Tamhankar), प्रसाद ओक (Prasad Oak) आणि ईशा डे (Esha Dey) यांचा 'गुलकंद' (Gulkand) हे दोन मोठे मराठी सिनेमे रिलीज करण्यात आले. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात केदार शिंदे दिग्दर्शित आणि सूरज चव्हाण स्टारर 'झापुक झुपूक' सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे या तिन्ही मराठी सिनेमांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. पण, असं असलं तरीसुद्धा या शर्यतीत सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' मात्र बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्याचं पाहायला मिळतंय.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी उंचावणाऱ्या सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा करणार असल्याची घोषणा केदार शिंदे यांनी केल्यापासूनच या सिनेमाची सर्वांना उस्तुकता होती. बहुचर्चित असा 'झापुक झुपूक' 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाची चर्चा बरीच झाली, मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची जादू काही दिसली नाही. पहिल्या तीन दिवसांत सूरज चव्हाणच्या सिनेमानं फक्त काही लाखांत कमाई केली होती. बिग बॉस मराठीमध्ये अवघ्या महाराष्ट्रानं सूरज चव्हाणवर भरभरून प्रेम केलं. पण, प्रेक्षकांनी त्याच्या 'झापुक झुपूक' सिनेमाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय.
'झापुक झुपूक'चं पहिल्या तीन दिवसांचं कलेक्शन किती?
केदार शिंदे दिग्दर्शित आणि सूरज चव्हाण अभिनीत 'झापुक झुपूक' सिनेमा 25 एप्रिलला शुक्रवारी रिलीज करण्यात आला खरा, मात्र बंपर ओपनिंग करणार असं वाटणाऱ्या 'झापुक झुपूक'ची ओपनिंग फारच संथ झाली. त्यानंतर वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल, असं वाटलं होतं. पण, एकंदरीत कलेक्शनवरुन मात्र तसं दिसत नाही. चित्रपटाची तीन दिवसांची कमाई एक कोटींहूनही कमीच आहे. 'झापुक झुपूक'चं पहिल्या तीन दिवसांचं कलेक्शन फक्त आणि फक्त काही लाखांमध्येच आहे.
समीर चौघुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक स्टारर 'गुलकंद'ची कमाई
सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅक करणाऱ्या 'गुलकंद' सिनेमानं पहिल्या दिवशी 55 लाखांची कमाई केली, दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 25 लाख कमावले, तर शनिवारी 42 लाखांचा गल्ला केला. एकंदरीतच या सिनेमाला रविवारी मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी म्हणजेच, सिनेमा रिलीज झाल्यानंतरच्या चौथ्या दिवशी 'गुलकंद'नं तब्बल 57 लाखांची कमाई केली. रिलीजनंतर फक्त आणि फक्त चारच दिवसांत 'झापुक झुपूक'नं 1 कोटी 79 लाखांची कमाई केली.
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव स्टारर 'आता थांबायचं नाय'
गेल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर स्टारर 'आता थांबायचं नाय' सिनेमा रिलीज करण्यात आला. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. फक्त चारच दिवसांत सिनेमानं छप्पडफाड कमाई केली आहे. या सिनेमानं अवघ्या दोनच दिवसांत 50 लाखांचा टप्पा पार केलाय. तर, तिसऱ्या दिवशी 17 लाख, चौथ्या दिवशी 4 लाखांची कमाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
