ट्रेंडिंग
Salman Khan Security Breach: सलमानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचे कारनामे, महिन्याभरापूर्वी अंधेरी RTOच्या दोन महिला अधिकाऱ्यांना शिविगाळ करत केलेली मारहाण
Salman Khan Security Breach: सलमान खानच्या घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेचा आरटीओमधील दोन महिला अधिकाऱ्यांशी वाद झालेला.
Salman Khan Security Breach: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सलमान खानच्या (Salman Khan) घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेचे अनेक कारनामे समोर आले आहेत. महिलेकडून अंधेरी आरटीओमध्ये (Andheri RTO) दोन महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानच्या घरात घुसलेल्या महिलेची अरेरावी थेट पाहायला मिळतेय. आधी बराच वेळ वाद घातल्यानंतर महिला थेट दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाते. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
सलमान खानच्या घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेचा आरटीओमधील दोन महिला अधिकाऱ्यांशी वाद झाला. गाडीच्या विक्रिवरुन झालेल्या वादातून महिलेनं थेट मारहाण करण्यात सुरुवात केली. साधारणतः 28 एप्रिल रोजी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एकापाठोपाठ एक असे सलमान खानच्या घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेचे कारनामे उघड झाले आहेत. आरटीओमध्ये महिलेनं गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 21 तारखेला पहाटे एका महिलेनं घुसखोरी केल्याची घटना घडली होती. घुसखोरी करणाऱ्या ईशा छाब्रा नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोर्टानं या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सलमान खानच्या घरात घुसणाऱ्या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 21 तारखेला पहाटे एका महिलेने घुसखोरी केल्याची घटना घडली होती. घुसखोरी करणाऱ्या ईशा छाब्रा नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. आज तिला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान सलमानची चाहती असल्यानं त्याला भेटण्यासाठी आल्याचं या महिलेनं पोलिसांना सांगितलंय. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नसल्याची माहिती आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Salman Khan च्या घरात मध्यरात्री का घुसलेली महिला? पोलीस चौकशीत ईशा छाबडाचा धक्कादायक खुलासा