4 लग्न, कित्येक गर्लफ्रेंड्स अन् 'वन नाईट स्टँड'; प्रेमात 'इमोशनल फुल्ल' बनला 'हा' अभिनेता, म्हणाला...

Kabir Bedi Speaks Up On One Night Stand: बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनी अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान चार वेळा लग्न केल्याबद्दल सांगितलं.

Continues below advertisement

Kabir Bedi Speaks Up On One Night Stand

Continues below advertisement
1/8
बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या चार लग्नांबद्दल उघडपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, त्यांची जवळजवळ सर्व लग्न 7 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलीत.
2/8
बॉलिवूड चित्रपटांमध्ये खुंखार विलनची भूमिका साकारणारे कबीर बेदी, हे सर्वात कुशल अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हा अभिनेता जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतो.
3/8
कबीर बेदी यांनी चार लग्न केली आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या चार लग्नांबद्दल उघडपणे सांगितलं.
4/8
कबीर बेदी यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की, जर त्यांनी त्यांच्या 4 लग्नांकडे पाहिलं, तर ते वन नाईट स्टँड नव्हते.
5/8
बीबीसी हिंदीशी झालेल्या संभाषणादरम्यान, कबीर बेदी यांना विचारण्यात आलं की, तुम्ही एका संपूर्ण पिढीला एक नातं संपवून दुसऱ्या नात्याकडे जाण्यास प्रोत्साहित केलं आहे का?
Continues below advertisement
6/8
कबीर बेदी म्हणाले की, मी कोण आहे याचा प्रचार करणारा? पुढे, अभिनेता म्हणाला की, असे अनेक प्रसंग आले जेव्हा मी महिलांच्या निवडीबद्दल मूर्खपणा केला, पण खरं सांगायचं तर, जर मी माझ्या नात्यांकडे पाहिलं, तर ती नाती वन नाईट स्टँड नव्हती.
7/8
कबीर बेदी पुढे म्हणाले की, त्यांचं पहिलं लग्न 7 वर्ष टिकलं, दुसरं लग्नही 7-9 वर्ष टिकलं, तिसरं लग्न 15 वर्ष टिकलं. त्यांनी सांगितलं की, त्यांचे सध्या परवीन दोसांझशी लग्न झालं आहे आणि तो गेल्या 19 वर्षांपासून तिच्यासोबत आहे.
8/8
कबीर बेदी म्हणाले की, त्यांचं लग्न टिकलं नाही, तरी त्यांचं नातं चांगलं आणि दीर्घकाळ टिकलं. त्यांनी असंही सांगितलं की, त्यांचे आजही त्यांच्या सर्व पत्नींशी मैत्रीचे संबंध कायम आहेत.
Sponsored Links by Taboola
OSZAR »