Actress Madhuri Pawar On Her Two New Shows: आपल्या लटक्या-झटक्यांनी वेड लावणाऱ्या अभिनेत्रीनं प्रेक्षकांना दिली गूड न्यूज; म्हणाली, 'आनंद द्विगुणीत झाला'
Actress Madhuri Pawar On Her Two New Shows: नुकतंच माधुरी पवारला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत, तिनं 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premacha) आणि 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re) या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Actress Madhuri Pawar On Her Two New Shows: 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala), 'देवमाणूस' (Devmanus), 'रानबाजार' (RaanBaazaar), 'अल्याड-पल्याड' (Alyad Palyad), 'लंडन मिसळ' (London Misal) या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतंच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत, तिनं 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premacha) आणि 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re) या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री माधुरी पवार तीच्या नव्या प्रोजेक्ट विषयी सांगते, "देनेवाला जब भी देता… देता छप्पर फाडके अशी माझी सध्याची भावना आहे. माझ्याकडे काही चित्रपट आणि सीरीज असल्या कारणानं मी गेली 2 वर्ष टीव्ही मालिका केलेली नाही. मालिकांचं आणि माझं जवळचं नातं आहे. अप्सरा आली, हा डान्स रिएलिटी शो जिंकल्यानंतर 'मी तुझ्यात जीव रंगला' तसेच 'देवमाणूस' या सीरियल केल्या. मला मालिका आवडतात. कारण मालिकांमुळे आपण घराघरात दररोज पोहचतो. आपल काम लोकांपर्यंत पोहोचतं."
पुढे ती सांगते की, "मी आता दोन्हीकडे शूट करत आहे. स्टार प्रवाहवर येड लागलं प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे हे शोज मी करत आहे. येड लागलं प्रेमाचं या सीरियलमध्ये मी निकी हा नेगेटिव्ह रोल करत आहे. ही भूमिका बिनधास्त, नीडर आणि रावडी आहे. तर शिट्टी वाजली रे या रिएलिटी शोमध्ये धम्माल मस्ती करताना मी तुम्हाला दिसणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट मध्ये मी वेगवेगळ्या भूमिकेत तुमच्या भेटीला येणार आहे. माझा सगळ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे की, तुम्ही हे कार्यक्रम नक्की बघणार. तुमच प्रेम कायम असच राहो हीच सदीच्छा"
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
