एक्स्प्लोर

Repo Rate Home Loan EMI: रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, बँकाही कर्जाचे व्याजदर कमी करणार? तुमचा होम लोनचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार?

RBI Repo Rate: धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा, रेपो रेट घटवून 6 टक्क्यांवर आणला, ईएमआय घटणार? रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीत निर्णय

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून यांच्याकडून रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये (Repo Rate) कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रमुख बँकांवर कर्जावरील व्याजदरात (Loan Interest rates) कपात करण्यासाठी दबाव निर्माण होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरुन बँकांनी कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी घटवल्यास गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचे आहे. त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांनी देखील गृह कर्जावरील व्याजदर कमी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे  रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता असते. याचा फायदा नव्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे समजा तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.50 टक्के असेल तर त्यामध्ये 0.25 टक्क्यांची कपात होऊन तो 8.25 टक्क्यांवर येईल.

होम लोनचा EMI किती रुपयांनी कमी होणार?

होम लोन - 40 लाख रुपये 

कर्जाचा कालावधी - 30 वर्ष 

व्याजदर - 8.5 टक्के 

ईएमआय - 30 हजार 757  रुपये 

होम लोन - 40 लाख रुपये 

कर्जाचा कालावधी - 30वर्ष 

नवे व्याजदर - 8.25 टक्के 

ईएमआय - 30 हजार 51 रुपये 

किती पैसे वाचणार ? 

706 रुपये प्रति महिना 

8 हजार 472 रुपये प्रति वर्ष

रेपो रेट म्हणजे काय?

जेव्हा बँकांना पैशाची (Funds) गरज भासते, तेव्हा त्या RBI कडून कर्ज घेतात. या कर्जावर बँकांना जो व्याजदर (Interest Rate) द्यावा लागतो, तो म्हणजे रेपो रेट. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्यास बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. बँकांना कमी दराने कर्ज मिळाल्यास त्या ग्राहकांनाही कमी व्याजदराने कर्जपुरवठा करु शकतात. RBI रेपो रेटचा वापर अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity) आणि चलनवाढ (Inflation) नियंत्रित करण्यासाठी करते. 

आणखी वाचा

धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा, रेपो रेट घटवून 6 टक्क्यांवर आणला, ईएमआय घटणार?

ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांनी तो निर्णय घेतलाच, चीनवर 104 टक्के आयातशुल्क

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar Bus Conductor : फुकट म्हणत आजी आजोबांना बसमधून उतरवलं,कंडक्टरचा संतापजनक प्रकारRajendra Hagawane Police custody | राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडीMaharashtra Weather : महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका नाही, हवामानाचा अंदाज, शेतकऱ्यांना सूचना काय?Rupali Chakankar PC : वैष्णवी हगवणे प्रकरणात आयोगाने खऱ्या अर्थाने वाचा फोडली - चाकणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली
दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या
दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या
वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा
वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा
मोठी बातमी, धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 82 लाखप्रकरणी विधिमंडळाकडून चौकशी होणार, किशोर पाटील संदर्भात धक्कादायक माहिती समोर
धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 82 लाखप्रकरणी विधिमंडळाकडून चौकशी होणार, किशोर पाटील संदर्भात धक्कादायक माहिती समोर
Embed widget
OSZAR »