Rajendra Hagawane Police custody | राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
Rajendra Hagawane Police custody | राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
पुणे : जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi) हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरुन राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्यातच, अजित पवारांनी काल पोलिसांना आदेश दिल्यानंतर आज फरार राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आता भारतीय जनता पार्टी (BJP) शहर महिला आघाडीच्यावतीने पुण्यातील (Pune) आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर कोर्ट परिसरात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पोलिसांनी अटकेनंतर हगवणे पिता-पुत्राला आज दुपारी न्यायालयात हजर केले आहे. तत्पूर्वीच, दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी भाजप महिला आघाडीने कोर्ट परिसरात धाव घेत हगवणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. यावेळी, महिलांनी आक्रम होत ज्या गाडीतून हगवणे पिता-पुत्रास कोर्टात आणण्यात आले, तेव्हा त्यांच्या अंगावर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या पिता-पुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजप महिला आघाडीने हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात हगवणेंच्या बॅनरला चप्पलने मारहाण करत कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. दरम्यान,भाजप महिला आघाडीच्या आंदोलनाची माहिती मिळताच कोर्टासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात आणण्यात आले असून त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मेपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
